Friday, April 29, 2011

माझे गाव !!!!

वाई
सहयाद्रीच्या कुशीत  वसलेले आणि कृष्णा नदीच्या काठावर सजलेले वाई शहर हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पुण्यापासून वाई शहर हे अंदाजे ९५ कि.मी. अंतरावर आहे.
पुरातन मंदिरांसाठी प्रसिद्ध आसलेल्या वाई शहराला दक्षिणकाशी किंवा विराटनगरी म्हणून सुद्धा ओळखले जाते.
वाई शहरामध्ये कृष्णा नदीच्या काठावर ढोल्या गणपतीचे पुरातन मंदिर  प्रसिद्ध आहे. त्याच मंदिरा समोर असलेले काशीविश्वेश्वर मंदिर सुद्धा प्रेक्षणीय आहे.
शहराच्या मध्य भागातून कृष्णा नदी वाहते. या कृष्णा नदीच्या काठावर सात घाट बांधलेले आहेत. त्या सात घाटांची नावे खालीलप्रमाणे:
१. गंगापुरी
२. मधली आळी
३. गणपती आळी
४. धर्मपुरी
५. ब्राह्मणशाही
६. रामडोह आळी
७. भीमकुंड आळी