Monday, December 19, 2022

उपयोगी मंत्र

उपयोगी मंत्र

ज्यांनी कोणीही हे मंत्र संकलन केले असेल त्यांचे आपल्या सर्वांकडून आभार! 🙏

(1) *अन्नाचा दृष्टी दोष घालवण्याचा मंत्र* (एकदाच म्हणावा)

अन्नं ब्रम्ह रसो विष्णूर्भोक्ता देवो महेश्वराः।

इति संचित्यं भुंजानं दृष्टी दोषो न बाधते।।

(2) *जेवणास सुरूवात करण्या आधी म्हणावयाचा मंत्र* —

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे।

ज्ञान वैराग्य सिदध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती।।

(3) *जेवणापुर्वी म्हणण्याचा असाच एक गीतेतील श्लोक* —

ब्रम्हार्पणं ब्रम्ह हविः ब्रम्हाग्नौ ब्रम्हणाहुतम्‌।

ब्रम्हैव तेन गंतव्य ब्रम्ह कर्म समाधिना।। 

(4) *नेत्र विकार होऊ नयेत म्हणून जेवण झाल्यावरचा मंत्र* — 

स्वर्यातिंच सुकन्यांच च्यवनं शक्रमश्विनौ।

भोजनान्ते स्मरेद यस्तु तस्य चक्षुर्न हीयते।।

(हात धुतल्यावर ओल्या हाताने दोन्ही डोळ्यांवर अल्प घर्षण करून पाणी लावावे, नेत्र चांगले राहतात)

(5) *भोजन झाल्यावर योग्य रितीने अन्न पचन व्हावे म्हणून जेवणानंतर मंत्र म्हणत पोटावरून हात फिरवावा.*

अगस्त्यं कुंभकर्णं च शनिं च वडवानलं।

आहार प्रति पाकार्थम्‌ स्मरामि च वृकोदरम्‌।।

अतापि भक्षितो येन वातापीच महाबलः।

अगस्तस्य प्रसादेन भोजनं मम जीर्यताम्‌।।

(श्रद्धा हवी तर या मंत्रांचा अनुभव येतो)

(6) *लहान मुलांना नजर, दृष्ट लागते त्यावर मंत्र*— 

अंजनी गर्भ संभूतं कुमारं ब्रम्हचारिणम्‌।

दृष्टी दोष विनाशाय हुनुमंतं स्मराम्यहम्‌।।

(7) *गाढ निद्रा येण्यासाठी, झोपताना खालील मंत्र म्हणावा* — 

अगस्तीर्माधवश्चैव मुचकुन्दो महाबलः।

कपिलो मुनि रास्तिकः पंचैते सुख शायिनः।

(8) *वाईट स्वप्ने पडू नयेत या साठीचा मंत्र —* 

(झोपण्या अगोदर म्हणावा)

अच्युतं केशवं विष्णुं हरि सोम जनार्दनम्‌।

हंसं नारायणं कृष्णं जपेत्‌ दुःस्वप्न शान्तये।।

(09) *घराबाहेर पडल्यानंतर, घरी परत येईपर्यंत रक्षण व्हावे यासाठी मंत्र —* 

वनमाली गदी शारंगी शंखी चक्रीय नन्दको।

श्रीमान्‌ नारायणो विष्णूर्वासुदेवो भिरक्षतु।।

(ह्यातील मंत्र नंबर -५ चा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला आहे काही वर्षांपूर्वी. जास्त जेवल्यावर जर पोट दुखत असेल तर तो मंत्र पोटावरुन हात फिरवत किमान ५ वेळा म्हणावा म्हणजे पचन नीट होते, गॅस निघून जातो.) 

Monday, August 1, 2022

अलिप्त होण्यातलं सुख

अलिप्त होण्यातलं सुख
       
      लहानपणी गौरी गणपतीच्या दिवसांत पारिजातकाच्या झाडाखालची पांढरीशुभ्र, शेंदरी देठाची फुलं वेचताना आमची तारांबळ उडत असे. कोणाच्या परडीत, कमी वेळात जास्त फुलं जमतात, ह्याची जणू चढाओढच लागत असे. 'माझी परडी', 'माझी फुलं' ह्या' मी' पणाचा भारी अभिमान वाटे.

      एकदा का ही फुलं देवाच्या चरणी अर्पण केली की मात्र ही फुलं, 'माझी फुलं' रहात नसून 'त्याची फुलं' होऊन जात. निर्माल्य होईपर्यंत ती त्याचीच फुलं बनून रहात. फुलांद्वारे 'मी पणा' देखील नकळत देवाला अर्पण होत असे.

      खरंच, किती क्षणिक असते, मी पणाचे सुख! कळ्यांची फुलं होताना, ती अंगाखांद्यावर खेळवताना तो पारिजातकही अभिमानाने म्हणत असेल, 'माझ्या कळ्या' , 'माझी फुलं'. पण एकदा का ही फुलं धरतीला अर्पण केली की होतोच की तोसुद्धा मीपणातून मुक्त!
     
    आयुष्य देखील असंच असतं. ह्या क्षणभंगुर आयुष्यात माझं घर, माझे कपडे, माझे दागिने, हे किती काळ आपण मिरवणार असतो?

    एकदा का आपला नश्वर देह अनंतात विलीन झाला की ह्या माझेपणावर आपला काहीही हक्क उरत नाही. 

    हे सगळं तत्त्वज्ञान माहीत असूनही आयुष्यात माझेपणाच्या मिठीतून केवळ वस्तूंनाच नव्हे, तर व्यक्तिंनादेखील सोडणं जमत नाही.

       मुलाचं लग्न झालं, तरी आईला स्वतःला मुलापासून अलिप्त करता येत नाही. 'तिचं घर', 'तिचा मुलगा', 'तिचा संसार' सुनेच्या ताब्यात सोपवणं तिच्या 'पझेसिव्ह' स्वभावाला जमत नाही. 

सुनेचं स्वतःच्या वेळेनुसार उठणं, स्वतःच्या वेळेनुसार घर आवरणं सासूला बघवत नाही. सासूचा जीव स्वतःच्या संसारात गुंतलेला असतो. सासरच्या पद्धतीच नवीन सुनेने अंगीकाराव्यात अशी तिची मनोमन इच्छा असते.

    वडील जेव्हा आपल्या व्यवसायात मुलाला सामावून घेतात, तेव्हा त्यांच्या पद्धतीनेच मुलाने व्यवसाय करावा असं त्यांना वाटतं. मुलाला त्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यवसायाचा विस्तार करु देण्याइतकं अलिप्त त्यांना होता येत नाही.

      आयुष्य जसं जसं पुढे जातं, तसा माणूस त्यात अधिकाधिक गुंतत जातो. गुंतण्यामुळेच कलह निर्माण होतात. सासू सुनेचं पटत नाही, बाप लेकात मतभेद होतात, आई मुलांत वाद होतात. आणि ह्या सर्व संघर्षांचं मूळ कारण असतं, 'गुंतणं'.

    आयुष्यात 'सोडणं 'जमलं पाहिजे. केवळ वस्तू अन् व्यक्तीच नव्हे, तर दुःख, भीती, यातना, वाईट आठवणी सुद्धा सोडता आल्या पाहिजेत.

    फुलं ज्याप्रमाणे परमेश्वर चरणी अर्पण केल्यावर ती त्याची फुलं होतात, त्याप्रमाणे दुःखसुद्धा परमेश्वर चरणी अर्पण करून आपल्याला त्यातून रितं होता आलं पाहिजे.

    आयुष्य सुखदुःखाची झोळी आहे. दुःखं गाळता आली पाहिजेत. दुःखांना 'डिलीट' करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. लोभ, मोह टाळता यायला हवेत. आशेपासून दूर रहाता आलं, तर निराशेचं दुःख पदरी पडत नाही.

      साध्या साध्या गोष्टीतून देखील मोह सुटत नाही. माझ्या फेसबुक पोस्टला 'लाइक' केलं पाहिजे. 'व्हाॅट्स ॲप पोस्टवर कॉमेंट टाकली पाहिजे. माझ्या जवळच्या लोकांनी माझी पोस्ट शेअर केली पाहिजे असा हट्ट, माझ्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे हा आग्रह, मी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे अशी इच्छा, अशा सगळ्या अपेक्षांना जेव्हा पूर्णविराम देता येईल, तेव्हा आपल्याला खऱ्या दृष्टीने अलिप्त होता आलं, असा त्याचा अर्थ होईल.
    
अलिप्त होण्याचा प्रयत्न करुन तरी बघा. मनातील सारं मळभ निघून जाईल.

कोसळून मोकळ्या झालेल्या निरभ्र आकाशासारखं  मनदेखील स्वच्छ, सुंदर होईल, ज्यात दुःखद आठवणींचे काळे ढगही नसतील किंवा मोहमयी पांढरे ढग देखील नसतील. 

    रिक्त होण्यातही सुख आहे. आपलं जीवन कोणाच्या तरी उपयोगी पडतंय, ही भावनाच खूप सुखावह आहे. पारिजातकाचं झाड तेच तर सुचवतंय. 

अगणित फुलांचं दान अर्पित करून, परत नव्याने बहरण्यासाठी सज्ज होतोच की बापडा... अगदी रोज... कोणत्याही पाशात न अडकता... अलिप्तपणेच!

🙏🙏🌹💞🌹🙏🙏

Wednesday, June 8, 2022

अट्टहास

*मला माझ्याच हातचं आवडतं बाई, माझ्यासारखं चविष्ट नाही होत कोणाचं, असं स्वतःचं म्हणून ती रांधत बसते..*
*माझ्या सारखं स्वच्छ नाही बाई कोणी, मला मीच पुसलेली फरशी आवडते भारी, असं म्हणून ती राबत बसते..*
*माझ्या शिवाय मुलांचं पान नाही हालत, म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातात देत, ती मुलांचं करण्यातच गुंतत बसते..*
*जोपर्यंत हा अट्टहास स्त्री सोडत नाही तोपर्यंत ती सुखी होऊ शकत नाही.!! तुमच्या या अट्टाहासा पायी तुम्ही कित्येकदा तुमच्या जवळच्या, तुमच्या मदतीला उभ्या असलेल्या 'स्त्री'ला नाकारता आणि नकळत तिचा अनादर करता आणि कायमचा एक मदतीचा हात, एक नात्याचा बंध, एक भावनिक आधार गमावून बसता.! प्रत्येक स्त्री नव्हे, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. प्रत्येकाचे गुण, कला, आवड-निवड ही वेगवेगळी असतें,*
*त्यामुळे एकमेकींना त्यावरून नावे ठेवणे सर्व स्त्री वर्गा ने बंद केले पाहिजे,*
*नसेल तिच्या घरात स्वच्छता फार, पण सुंदरता तिच्या मनात असेल, स्वभावात असेल,*
*तिच्यात अन्नपुर्णा नसेल, पण सरस्वती असेल..*
*तिच्यात सरस्वती नसेल तर लक्ष्मी असेल..*
*तिच्यात खुप कला नसतील कदाचित, पण ती स्वयंपाकात निपुण असेल,*
*एखादीला नसेल येत घरातलं काम, पण अभ्यासात अव्वल असेल कदाचित,*
*एखादी शब्दात रमणारी असेल, एखादी सुरेल असेल, एखादी नाटकात कमाल असेल. एखादी नखशिखांत "कलाकार" असेल..*
*त्यामुळे आपण या गुणांतल्या भिन्नतेचा मनापासुन स्वीकार करुन नातं पुढे नेलं तर नात्यांमध्ये खुप सुंदरता येईल, सहजता येईल.!! स्वतः मध्ये जे आहे.* *"ते" च दुसऱ्या मध्ये शोधण्याचा अट्टहास बंद करा आणि त्याच्या मध्ये "जे" आहे त्याचा आदर करा.. तेंव्हा तुम्हाला नात्यातलं खरं सुख गवसेल.! आणि तुमच्या चेहऱ्यावर खरं हास्य फुलेल..!*
*समस्त "स्त्री वर्गास" समर्पित.🙏🏻🏵️🌹🏵️🙏🏻*

नांदत्या घराची किंमत

*नांदत्या घराची किंमत*
*******************

दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात. 

त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले. वाटलं, कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते.

7.30 ला मोबाईल वरून फोन आला. जरा थकलेला, पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता. "मी आलेय फोटो घेऊन. डेक्कनच्या बस स्टॉप वर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का?" 

अरे बाप रे ..एवढ्या वयस्क आजी. मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला. झक्कपैकी टू व्हिलर वर बसून आजी आल्या. फिकटस नऊवारी पातळ , सुपारीएवढा अंबाडा, हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात. 

ब्रेकफास्ट ची वेळ होती. नवरा ग्राऊंडवरून 10 मिनिटात येणार होता . मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती. मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती . लेक पसार झाली काहीतरी काम काढून . 

शेवटी मी डाईनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली . माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या," मी करते ग पोहे , तू निश्चिनतीने फोटोचे काम हातावेगळे कर ." मी जरा संकोचले पण पर्याय नव्हता म्हणून तेथून बाजूला झाले . माझे काम होस्तोवर पोहे तय्यार .
भरपूर ओला खोबरं आणि कोथिंबीर घालून आजीनी मस्त पोहे केले होते . हक्कानी पापड मागून घेतले . मी भाजते म्हंटलं तर म्हणाल्या " थांब मी तळते कि ".

एव्हाना लेक आणि नवरा घरी आले आणि आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायला घेतला .आजींच्या हातचे चविष्ट पोहे खाऊन घरातले खुश . जाते जाते म्हणत आजी जेवण करूनच निघाल्या इतका आग्रह माझ्या माणूसवेल्हाळ लेकीने आणि नवऱ्याने त्यांना केला . आणि आजीने पण खान्देशी भरीत करून त्यांच्या आग्रहाला पोच दिली.

निघताना मी जरा संकोचून आजींना म्हंटले , " आजी खूप त्रास घेतलात हो ."
आजी जे उतरल्या त्यात समाधान होते आणि वेदनाही . 

त्या म्हणाल्या "नांदत्या घरात खूप दिवसांनी वावरले,अगदी स्वयंपाकघरातही हक्क दाखवला...खूप छान वाटलं ग "

या एका वाक्यात मीच रडवेली झाले . 

"पुन्हा याल ना ? " त्या उत्तरादाखल किंचित हसल्या अन म्हणाल्या "परमेश्वराची इच्छा".

खरा सांगू .. सणासुदीला पाव्हण्यारावळ्यांचा मर्यादेपेक्षा जास्त राबता झाला कि मी जरा वैतागायचे..... आजींच्या " नांदत्या " या एका शब्दाने मला ती किंमत कळली .

🙏🌷🙏🌷🙏🌷🙏