Thursday, January 28, 2021

गोत्र म्हणजे काय !

।। गोत्र म्हणजे काय !............ 

तर गोत्र म्हणजे🙏

।। धार्मिक विधी करताना बर्याच वेळा आपले गोत्र काय 
।। असा प्रश्न गुरुजी विचारतात तेंव्हा गोत्र म्हणजे काय 
।। असा प्रतिप्रश्न करणारे देखिल असतात अशा वेळेला 
।। पुर्वजांपैकी कोणी एक पुरुष असे उत्तर देउन वेळ 
।। मारुन नेणारे काही जण असतात. पण तसे नसून 
।। गोत्र ही वेद्यीक धर्माने दिलेलि देणगी आहे. जन्मवंश 
।। शास्त्रदृष्ट्या अतंत्य सूक्ष्मस्तरीय एक मानवशाखा आहे 
।। " धर्मसिंधु " ग्रंथामध्ये गोत्राचे लक्षण पुढील प्रमाणे 
।। दिलेले आहे 

।। 'तत्र गोत्र लक्षणम् - विश्वामित्रो जमदग्निर्भरद्वाजो 
।। थ गौतमः । अत्रिर्वसिष्ठः कश्यप इत्येते सप्तऋष्यः ॥ 

।। विश्वामित्र, जमदग्नि, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, 
।। आणि कश्यप हे सात ऋषी आहेत. व आठवे ऋषी 
।। अगस्त्य हे होत. यापैकी प्रत्येक ऋषीचे आपत्य 
।। म्हणजे गोत्र होय. गोत्रांची संख्या अगणीत असली 
।। तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून 
।। त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली आहे. 
।। त्या त्या ऋषीं च्या नावांना गोत्र असे म्हणतात.

।। प्रमुख गोत्र व त्यांची प्रवरे !............

१ अत्रि :- आत्रेय - आर्चासन - श्यावाश्व
२ अघमर्षण :- वैश्वामित्र - अघमर्षण - कौशिक
३ आंगिरस :- आंगिरस - आंबरीष - यौवनाश्व
४ आयास्य :- आंगिरस - आयास्य - गौतम
५ आर्ष्टिषेण :- भार्गव - च्यावन - आप्न्वन - आर्ष्टिषेण - अनूप
६ उपमन्यु :- वासिष्ठ - इंद्रप्रमद - आभ्रद्ववसु
७ कण्व :- आंगिरस - आजमीढ - कण्व
८ कपि :- आंगिरस - आमहीयव - औरुक्षयस
९ काश्य्प :- काश्य्प - अवत्सार - नैधृव( काश्य्प ) - अव्त्सार - असित
१० कुत्स :- आंगिरस - माधांत्र - कौत्स
११ कौंडिण्य :- वासिष्ठ - मैत्रावरुण - कौंडिण्य
१२ कौशिक :- वैश्वामित्र - अघमर्षण - कौशिक
१३ गार्ग्य :- आंगिरस - शैन्य - गार्ग्य
१४ जामदग्न्य :- भार्गव - च्यावन - आप्न्वन - और्व - जामदग्न्य
१५ नित्युन्द :- आंगिरस - पौरुकुत्स्य - त्रासदस्यु
१६ नैध्रुव :- काश्य्प - अव्त्सार - नैध्रुव
१७ पाराशर :- वासिष्ठ - शाक्त्य - पाराशर
१८ बादराण :- आंगिरस - पौरुकुत्स्य - त्रासदस्यु
१९ बाभ्र्व्य :- वैश्वामित्र - देवरात - औदास
२० बिद :- भार्गव - च्यावन - आप्न्वन - और्व - बिद
२१ भारव्दाज :- आंगिरस बार्हस्पत्य - भारव्दाज 
२२ मित्रायु :- भार्गव - च्यावन - देवोदास
२३ मुद्ग् गल :- आंगिरस - भार्ग्याश्व - मौद्ग्गल्य
२४ यस्क :- भार्गव वैतहव्य - सावेतस
२५ रथीतर :- आंगिरस - वैरुप - रथीतर
२६ वत्स :- भार्गव - च्यावन - आप्न्वन - और्व - जामदग्न्य
२७ वासिष्ठ :- वासिष्ठ - इंद्रप्रमद - आभ्रद्ववसु
२८ विष्णुवृद्ध :- आंगिरस - पौरुकुत्स्य - त्रासदस्यु
२९ वैश्वामित्र :- वैश्वामित्र - अघमर्षण - कौशिक
३० शांडिल्य :- शांडिल्य - असित - देवल
३१ शालाक्ष :- वैश्वामित्र - शालंकालय - कौशिक
३२ शौनक :- भार्गव - शौनहोत्र - गार्स्तमद 

।। प्रवर म्हणजे काय !.............

।। गोत्रांची संख्या अगणीत असली तरी धर्माने त्यांची 
।। व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी 
।। पन्नास गणामध्ये केलेली आहे. प्रत्येक गोत्रांना 
।। प्रर्वतक ऋषी असतात. काही गोत्रांना एक, काही 
।। गोत्रांना दोन, काही गोत्रांना तिन ते पाच पर्यंत प्रवर्तक 
।। असतात या प्रवर्तक ऋषी गणांना (प्रवर) असे म्हणतात
।। काही समाजामध्ये आजही सप्रवर विवाह वर्ज केला 
।। जातो. तसेच उपनयन प्रसंगी बटूस गोत्र प्रवर ,
।। स्वतःची वेदशाखा, सूत्र, स्वतःचे नक्षत्र व चरण नाम 
।। ह्यांची माहीती करुन दिले जाते.

।। ही माहिती शेयर करण्याचे कारण म्हणजे आपले 
।। पूर्वज आणि आपली हिंदू संस्कृती किती संपन्न होती 
।। ह्याचे हे छान उदाहरण आहे. 

।। जेनेटिक्सचा अभ्यास करणाऱ्यानी हे मान्य केलेले 
।। आहे की एका गोत्रात लग्न केल्यामुळे अनेक आजार 
।। ( जेनेटिकली ट्रांसमिटेड डिसीज ) होऊ शकतात 
।। आणि आपल्या पूर्वजानी जे नियम घालून दिले 
।। आहेत ते योग्य आहेत. यातील बऱ्याच गोष्टीची उकल 
।। जेनेटिक्सवाले आता करत आहेत. 
।। आपली हिंदू संस्कृती अतिशय पुढारलेली आहे .

Saturday, January 23, 2021

कुणी कुणाचेच नाही

*नेहमी लक्षात ठेवा*
*कुणी कुणाचेच नाही*

सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते   
जेव्हा हरण झाले तेव्हा  कोणी नव्हते.

राजा दशरथला चार पुत्ररत्न ह़ोते;
जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते

लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता;
पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते

श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते ;
जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते,

लक्ष्मण पण एक तरबेज योद्धा होते;
पण शक्ति लागली तेव्हा कोणी नव्हते,

शरशय्या वरती भीष्म पितामह होते;
वेदनेचे भागीदार कोणी ही नव्हते 

राजपुत्र अभिमन्यु सर्वांचे लाडके होते ;
पण चक्रयुव्ह मधून काढण्या साठी कोणी नव्हते,

सर्वां साठी,त्रिकाल बाधीत सत्य हेच आहे, 
या जगात आपले कोणी ही नाही.

ज़े विधात्याने लिहिले,आणि जसे आपले कर्म आहे,त्या पुढे कोणी जाऊ शकत नाही.

*जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर*  हेच सत्य आहे.

*केवळ कर्मच आपले आहे*       
     *देवापेक्षा कर्माची* 
      *भिती  बाळगावी,*
   *एक वेळ देव माफ करील पण कर्म नाही.*
*फुंकर मारून आपण दिवा विझवु शकतो, पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोण विझवु शकत नाही..*

*🙏🏾🙏🏾*

Thursday, January 14, 2021

नैवेद्य म्हणजे काय? तो कसा दाखवावा?

*नैवेद्य म्हणजे काय? तो कसा दाखवावा?*

देवाला निवेदनीय असे जे द्रव्य ते द्रव्य म्हणजे नैवेद्य होय. म्हणजे ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी, त्याला देता येण्यासारखी खाद्य वस्तू, खाद्य पदार्थ म्हणजे नैवेद्य असे आपण म्हणू या.

नैवेद्य हा पाच प्रकारचा असावा.
‘‘नैवेदनेय असेल ते प्रशस्त आणि पवित्र असावे. ते भक्षणाला योग्य असावे आणि पाच प्रकारचे असावे. त्यालाच ‘नैैवेद्य’ म्हणतात.
भक्ष्य – गिळता येण्यासारखे,
भोज्य – चावून खाता येईल असे,
लेह्य – चाटता येईल असे,
पेय – पिता येईल असे आणि
चुष्य – चोखता येईल..
असे ते पाच प्रकार आहेत.
असा हा पंचविध नैवेद्य देवाची पूजा करूनै त्याला समर्पावा.’’

तंत्रासारातील मूळ श्लोक पुढीलप्रमाणे-
नैवेदनैय यद द्रव्यं,
प्रशस्तं प्रयतं तथा
तद भक्ष्यार्हम पंचविधं
नैवेद्यमिति कथ्यते।
भक्ष्यं, भोज्यं च लेह्यं च,
पेयं चुष्यं च पंचममे
सर्वत्र चैतनैवेद्यमाराध्यास्यै नैिवेदयेत

विष्णूला दुधभात,
शिवाला दहीभात,
गणपतीला मोदक अथवा गूळखोबरे,
सूर्याला गूळभात आणि
देवीला सांजा (तिखट सांजा नैाही. गोडाचा सांजा म्हणजेच शिरा.) किंवा श्रीखंड प्रिय आहे.
दूध आणि फळे सर्व देवांना प्रिय आहेत.

नैैवेद्य कसा दाखवतात?
»  नैवेद्य दाखवताना देवापुढे चौकोनी मंडळ करून त्यात पुनः ७ असे चिन्ह करून मग त्याच्यावर नैवेद्याचे ताट, भांडे, पात्र ठेऊनै मग नैवेद्य दाखवावा.
»  या पात्रावर तुलसीपत्र ठेऊन मगच तो नैवेद्य देवाला अर्पण करावा.
»  तुलसीपत्र ठेवले की, ‘माझा यावरचा अधिकार संपला आहे आणि आता हे पूर्णत: तुझे आहे’, हा भाव व्यक्त होतो आणि आपला अधिकार संपतो.
»  सोन, रूपे, तांबे, दगड, कमलपत्र आणि यज्ञीय लाकूड यापैकी एका पात्रात ठेऊन नैवेद्य दाखवावा असे सांगितले गेलेले आहे.
»  नैवेद्य देवाच्या उजव्या हाताला ठेवावा. डाव्या हाताला ठेवल्यास तो अभक्ष्य म्हणजे खाण्यास अयोग्य होतो.
»  तुलसीपत्र, दुर्वा किंवा पुष्प यांनी नैवेद्याचे प्रोक्षण करावे. म्हणजे यांनी नैवेद्यावर पाणी शिंपडावे म्हणजे नैवेद्य शुद्ध आणि दाखवण्यास, अर्पण करण्यास योग्य होतो.
»  मग नैवेद्याचे पात्राभोवती डावीकडूनै उजवीकडे असे आपल्या उजव्या हाताने पाणी सोडत मंडल करत यावे.
»  नंतर "ॐ प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा’’ असे म्हणत म्हणत नैवेद्याचा घास देवाच्या मुखाकडे न्यावा. त्यावेळी आपला डावा हात आपल्या हृदयाजवळ असावा, मान झुकलेली असावी. असे करून झाले की, ‘मध्ये पानयं समर्पयामि’ असे म्हणून उदक द्यावे. म्हणजे पाणी द्यावे म्हणजे पाणी जवळ न्यावे अथवा ताम्हनात सोडावे.
मग पुन्हा वरचा हा ‘स्वाहा’ मंत्र म्हणत म्हणत ज्या देवतेला तो नैवेद्य दाखवायचा असेल त्या देवतेचे नाव घेत (इथे विशिष्ट देवतेचे नाव घेत नसल्याने मी अमुक देवताभ्यो म्हणत आहे) ‘अमुक देवताभ्यो नैम: नैवेद्यं समर्पयामि’ असे म्हणावे आणि ताम्हनात उदक सोडावे. [उदक म्हणजे पाणी] महानैवेद्य हा पुरण, वरण, पक्वान्न ,भाज्या, कोशिंबिरी इत्यादी असावा.
नैवेद्य दाखवून झाल्यावर देवाची आरती करावी.
नैैवेद्य दाखवून झाला की जो पदार्थ असेल त्याचे ‘प्रसादात’ रूपांतर होते. त्यामुळे मी देवाला प्रसाद दाखवतो आहे असे म्हणता येत नाही तर मी देवाला नैवेद्य दाखवतो आणि तुला त्याचा प्रसाद देतो हे योग्य आहे. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर आपण तो लगेच स्वत:ही खाऊ नये आणि इतरांना लगेच वाटू सुद्धा नये.
थोडा वेळ तो देवापुढे तसाच ठेवा. हां, पण झुरळे, पाली, उंदीर, माशा, मुंग्या यांचा त्याला उपद्रव होत नाही ना हे पाहणे अगत्याचे आहे हे सांगायला नकोच.
आपल्याला प्रत्यक्ष नैवेद्य दाखवता येत नसेल तर आपण मानस पूजा करून त्यामध्ये आपल्याला हवा तो नैवेद्य प्रभूला अर्पण करू शकतो आणि या मानस पूजेमध्ये प्रचंड शक्ती आहे. अगदी प्रत्यक्ष पूजेपेक्षाही. कारण आपण त्यावेळेला देवाशी पूर्णत: एकरूप होऊनै जातो.
मनाला प्रयत्न करून मानस पूजेचे चित्र रंगवावे लागते आणि मनाला मग हळूहळू असा हा शांतीरूप आकार यायला लागतो आणि मग आपले जीवन पवित्र, सुगंधी बनून जाते.
आपला देह हा देवाचे मंदिर होतो आणि आत आत्मा परमेश्वर आहे हे कळायला लागते.

--
सचिन जोग