Monday, March 13, 2017

श्रीगणपती स्तोत्र


साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका
भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती
प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते
पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते
सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक
अकरावे गणपती बारावे श्री गजानन
देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर              
विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिदे
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ
एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी संशय
नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें
श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले

श्रीगणपती स्तोत्र संपूर्ण

No comments:

Post a Comment