Tuesday, July 19, 2011

श्रीमारुतिस्तोत्र

 
भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुति
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ॥
महाबळी प्राणदाता, सकंळा उठवी बळें ।
सोख्यकारी दःखहारी, दुत वैश्ण्वगायका ॥

दीननाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता, भव्यसिंदुरलेपन ॥
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा, पुरातना ।
पुण्यवंता, पुण्यशीला, पावना परितोशका ॥

ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोट्ला पुढे ।
काळाग्नी, काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ॥
ब्रम्हांडे माइली नेणों, आंवळें दंतपंगती ।
नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा, भुरकुटी, ताठिल्या- बळें ॥

पुछ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंड्लें बरीं ।
सुवर्णकटिकासोटी, घंटा किंकिणि नागरा ॥
ठकारे पर्वताऐसा, नेट्का सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठे, महाविध्युल्लतेपरी ॥

कोटिच्या कोटि उड्डाणें, ज़्हेपावें उत्तरेकडे ॥
मंद्राद्रीसारीखा द्रोणु, क्रोधें उत्पाटिला बळे ॥
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगतीं ।
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ॥

अणुपासोनी ब्र्म्हांडायेवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें , मेरुमांदार धाकुटे ॥
ब्र्म्हांडाभोंवतें वेढे , वज्रपुछए करुं शके ।
तयासी तुळणा कैंची , ब्रम्हांडीं पाहतां नसे ॥

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सुर्यमंड्ळा।
वाढ्ता वाढता वाढे, भेदिलें शुन्यमंडळा ॥
धनधान्य्पशुवृध्दि, पुत्रपौत्र समग्रही ।
पावती परुपविद्यादि, स्तोत्रपाठें करुऐयां ॥

भूतप्रेतसमंधादि, रोगव्याधि समस्तहि ।
नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ।
हे ध्ररा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी ॥
दृढदेहो निसंदेहो सैख्या च्न्द्रकळागुणें ॥

रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू ।
रामरुपी अंतरात्मा, दर्शनें दोश नासती ॥
 
।। इति श्रीरामदासक्रुत संकटनिवारसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णं ॥
 
-- 

No comments:

Post a Comment