Thursday, October 30, 2025

‘साॅरी’ म्हणायला आढेवेढे नकाेतच

आपण सारे कळत नकळत चुका करताे. बऱ्याचदा आपल्याला विवशतेपाेटी वा मूड ठीक नसल्यामुळे खाेटे बाेलावे लागते. काेणी पार्टीला बाेलावले तर आपण आजारी असल्याची सबब सांगताे. कित्येकदा एखादी व्य्नती आपल्याला नकाेशी असेल तर आपण मुलांकरवी खाेटे सांगून तिला पिटाळून लावताे.पण लाेकांना हे कळत नाही की, जेव्हा असे खाेटे बाेलल्यानंतर वासबबीसांगितल्यानंतर आपण पकडले जाताे, तेव्हा आपण साॅरी बाेलण्याऐवजी वाद घालू लागताे. निरनिराळी कारणे सांगू लागताे.
खरे तर आपण खाेटे बाेलताे आहाेत हे समाेरच्याला कळत असते व ताे त्यासाठी आपल्याला माफही करू इच्छित असताे; पण त्यासाठी आपण माफी मागावी अशी त्याची इच्छा असते.

https://www.esandhyanand.com/Encyc/2022/6/16/Sorry.html


Monday, July 22, 2024

जिंकावे नि जगावेही : आयुष्याचा ताल आणि तोल!

 जिंकावे नि जगावेही : आयुष्याचा ताल आणि तोल!


रोजचं आयुष्य आता भरधाव वेगाचं आहे. त्यात पळभर थांबून विश्रांती घेणं, स्वत:शी संवाद साधणं कठीणच. पण ‘सजगतेनं जगण्या’ची संकल्पना अमलात आणायची असेल, तर मात्र हे करावंच लागेल. ते ज्याचंत्यानंच समजूनउमजून करायला हवं. आयुष्याचा ताल आणि तोल सांभाळता यायलाच हवा!


‘सजगतेनं जगणं’ या संकल्पनेत जागरूकतेला मोठं महत्त्व आहे. मग ही जागरूकता आपल्या निर्णयांच्या आणि त्यांच्या परिणामांच्या बाबतीतली असो किंवा आपले विचार आणि कृती या बाबतीतली असो. जागरूकतेनं जगताना आपण निवडलेल्या पर्यायांसह आपल्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेणं अभिप्रेत आहे. सोप्या शब्दात सांगायचं, तर ‘सजगतेनं जगणं’ म्हणजे आपल्या आयुष्याचा वेग कमी करत, आपण कसं जगतोय याकडे अधिक बारकाईनं लक्ष देणं. इंग्रजीमध्ये ‘माइंडफुल’ हा शब्द प्रचलित आहे.


पण हे साध्य करायचं कसं? सगळं जग आपल्याला धावत सुटायला भाग पाडत असतं आणि आपणही कुठल्या ना कुठल्या ध्येयाच्या किंवा गोष्टीच्या मागे अथक धावत असतो. पण या भरधाव गतीमुळे आपण इतके गुंतून पडतो, की त्यातून चिंता, ताणतणाव आणि गुदमरून टाकणारा दबाव यात आपण अडकत जातो.


एकदा गुंतवणुकीच्या संदर्भात निर्णय घेण्याविषयी वॉरन बफे म्हणाले होते,‘‘केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरण्यासाठी वेळ, शिस्त आणि संयम हे तिन्ही आवश्यक आहेत. कितीही कौशल्याने प्रयत्न केले तरी काही गोष्टींचे परिणाम दिसायला वेळ लागतोच!’’ असाच आणखी एक किस्सा, ‘अॅमेझॉन’च्या जेफ बेझोस यांनी एका मुलाखतीमध्ये वॉरन बफे यांना विचारलं होतं, ‘‘तुमच्या गुंतवणुकीच्या संकल्पना अमलात आणायला अतिशय सोप्या आणि फायदेशीर आहेत. मग सगळे जण त्याप्रमाणे का वागत नाहीत?’’ यावर ते हसून म्हणाले, ‘‘कारण कोणालाही हळूहळू श्रीमंत व्हायचं नाहीये!’’


आपल्या आयुष्यात तरी काय वेगळं घडत असतं? आपलं सगळं लक्ष आपल्याला अपेक्षित असलेले परिणाम झटकन कसे मिळतील याकडे असतं. पण घाईगडबडीत केलेल्या कोणत्याही कृतीचे समाधानकारक आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम दिसणं हे तसं अवघडच! एक गोष्ट सांगतो, कुणाल वर्माची.


कुणाल दिल्लीच्या गजबजलेल्या वातावरणात वाढलेला. लहानपणापासून ‘खडतर परिश्रम केल्यानंच यश मिळतं,’ असे संस्कार झालेले. ‘उत्तम, यशस्वी व्यावसायिक जीवन घडवणं हेच अंतिम ध्येय,’ हे आईवडिलांनी मनावर बिंबवलेलं. कुणाल अभ्यासात अतिशय हुशार. आई-वडीलसुद्धा त्याला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावायचे. त्याच्या ‘बायोडेटा’मध्ये अधिकाधिक चांगल्या गोष्टींची भर पडावी आणि कोणत्याही उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सहज प्रवेश मिळावा, हा उद्देश. शाळा, शिकवण्या, परीक्षा या सगळ्या चक्रात गुंतून पडल्यामुळे त्याला निवांत विचार करायला वेळच मिळत नसे. अखेर त्याला ‘आय.आय.टी.’मध्ये प्रवेश मिळाला आणि कष्टांचं सार्थक झालं! ‘आय.आय.टी.’मधलं वातावरण अटीतटीच्या स्पर्धेचं होतं. एक लेक्चर झालं की दुसऱ्या लेक्चरला पळणारे, प्रकल्पांवर रात्र-रात्र काम करणारे, सतत कुठल्या ना कुठल्या परीक्षेच्या, इंटर्नशिपच्या तयारीत मग्न असणारे विद्यार्थी, हे एकूण चित्र. कुणालनं स्वत:ला या चक्रात झोकून दिलं. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अभ्यासाच्या व्यापात तो बुडालेला असायचा. उत्कृष्ट मार्क मिळवून गलेलठ्ठ पगाराची, प्रतिष्ठित नोकरी मिळवायची, हा ध्यास. इतकी दमणूक होत असूनही यशस्वी होण्याचा केवळ हाच एकमेव मार्ग आहे, यावर त्याचाही दृढ विश्वास होता. त्या विश्वासावर तो सगळं रेटून नेत होता. पदवीधर झाल्यावर एका मोठ्या, बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये त्याला नोकरी मिळाली. साहजिकच या नोकरीच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षाही मोठ्या होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी त्याला वेळही तितकाच द्यावा लागत होता. एकापाठोपाठ एक मीटिंग्ज, न संपणाऱ्या चर्चा, डेडलाईन्स आणि सतत प्रवास यानं आयुष्य व्यापून गेलं. आठवड्याचे सत्तर तास तो काम करत असे. वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देणं राहून जात होतं.


एका संध्याकाळी पाऊस पडत होता आणि दिवसभराच्या कामानं दमलेला कुणाल त्याच्या गाडीतून घरी परतत होता. डोक्यात ऑफिसच्या प्रोजेक्टसंबंधी काही विचार सुरू होते. त्याला ते दुसऱ्या दिवशी ‘क्लायंट’समोर मांडायचे होते आणि त्याच्या तयारीसाठी लवकर घरी पोहोचायचं होतं. त्या विचारांत त्याला सिग्नलचा लाल दिवा दिसलाच नाही. चौकात समोरून येणाऱ्या भरधाव गाडीची त्याच्या गाडीला जोरदार धडक बसली. कुणालला जबर मार लागला. त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दहा आठवडे तो रोजच्या धकाधकीच्या आयुष्यापासून दूर नुसता पडून होता. पण यामुळे एक झालं, की मनात चाललेला विचारांचा कोलाहल ऐकणं त्याला भाग पडलं. हे त्यानं आजवर कधीच केलं नव्हतं.


हा अपघात कुणालच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. इथून पुढे काहीही झालं तरी इतकं भरधाव वेगानं धावत सुटायचं नाही आणि आयुष्याला इतकं गृहीत धरायचं नाही असा त्यानं निश्चय केला. आयुष्याची गती हळूहळू कमी करत, काही वेळ फक्त स्वत:साठी काढायला त्यानं सुरुवात केली. कामाला मर्यादा घालून घेतल्या. ऑफिसमधलं काम घरी आणायचं नाही, ऑफिसच्या बाहेर पडल्यावर ‘ई-मेल्स’ पाहायचे नाहीत, त्याचबरोबर आपल्या छंदांसाठी आणि आप्तेष्टांसाठी शनिवार-रविवार राखून ठेवायचे, असे काही बदल जाणीवपूर्वक केले. वाचनाचा आणि ड्रम वादनाचा जुना छंद पुन्हा जोपासायला सुरुवात केली. यातून त्याला अतिशय आनंद, निवांतपणा मिळू लागला.


जेव्हा आपल्या डोक्यावर कुठल्या तरी संकटाचा धोंडा कोसळतो, तेव्हाच आपण त्यातून काहीतरी शिकतो. त्याआधी मिळणारे सगळे धोक्याचे संकेत आपण धुडकावून लावतो. जेव्हा छप्परच कोसळतं, तेव्हाच आयुष्यातले सगळ्यात मोलाचे धडे आपण गिरवतो. पण आयुष्य जगायला नव्यानं सुरुवात करण्यासाठी, उत्तम निर्णयक्षमता विकसित करण्यासाठी कुठलं तरी संकट यायलाच हवं का?


आपण सगळे सवयीचे गुलाम आहोत. रोज उठून त्याच त्या गोष्टी तोपर्यंत करत राहतो, जोपर्यंत त्यात बदल करायला आपल्याला भाग पाडलं जात नाही! आयुष्य म्हटलं, की बारीकसारीक तक्रारी, अडचणी असायच्याच. त्या स्वीकारत, त्यांच्याशी जुळवून घेत आपण पुढे जात असतो. अचानक आपल्या आयुष्याला एखाद्या संकटामुळे हादरा बसतो. पण खरंतर त्यामुळेच सुखासीनतेतून बाहेर पडून आपण नवीन काही तरी करून बघायला प्रवृत्त होतो. पण जेव्हा आपण सजगतेनं जगायला सुरुवात करू, तेव्हा रोजच्या आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या अनेक गोष्टी आपल्याला दिसतील, आठवतील. त्या अमलात आणण्यासाठी कुठलंही संकट येण्याची वाट न बघता आपण त्या प्राधान्यानं करून मोकळे होऊ शकतो! शरीर, मन, भावना आपल्याला वेळोवेळी सूचना देतच असतात. त्यांच्याकडे वेळीच लक्ष दिलं, तर कधी आणि कोणता बदल करणं गरजेचं आहे, हे सहज लक्षात येऊ शकेल.


जीवनाची भरधाव गती नियंत्रणात आणायची असेल, तर शिस्त असायलाच हवी. स्वत:साठी काही वेळ आवर्जून काढण्याची सवय लावून घेतल्यानं प्रचंड वेगानं धावणारं आयुष्य थोडं संथ होतं. सततच्या व्यग्रतेतून काही वेळ बाजूला होऊन, स्वत:च्या शरीराला आणि मनाला भोवतालाशी जुळवून घेण्यासाठी अवकाश मिळतो. मजा अशी, की मोबाइल, लॅपटॉप अशा अनेक अत्याधुनिक यंत्रांच्या गराड्यात आपण सतत असूनही स्वत:साठी मोकळा वेळ काढण्याची आठवण मात्र एकही यंत्र करून देत नाही! केवळ एकाच गोष्टीच्या मदतीनं हा वेळ काढता येऊ शकतो, ती म्हणजे शिस्तबद्धता!


दिवसभर कितीही व्यग्र असलो आणि तरीही त्यातून थोडा वेळ स्वत:साठी काढायचा असेल, तर स्वयंशिस्त गरजेची आहे. काही गोष्टी अवघड असल्या किंवा तुम्हाला आनंद देणाऱ्या नसल्या तरी त्या वेळच्या वेळी पार पाडण्यासाठी शिस्त आवश्यक आहे. ऑफिसचं काम घरी न आणणं, मोबाइल, लॅपटॉपसाठी विशिष्ट वेळ निश्चित करणं, ती वेळ झाल्यावर ही उपकरणं बंद करून बाजूला ठेवून देणं, स्वत:ला आनंद देणाऱ्या गोष्टीसाठी आवर्जून वेळ काढणं, हे यात आपसूक आलंच. थोडक्यात काय, तर आपल्या आयुष्याच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करताना नियोजित पद्धतीनं काम करायला हवं, पण त्याचबरोबर स्वत:लाही आवश्यक तेवढी मोकळीक द्यायला हवी आणि ती देता यावी यासाठी शिस्त हवीच.


कुणालच्या बाबतीत शिस्तबद्धतेचा अर्थ रोजच्या व्यग्रतेतून काही वेळ शांतपणे, स्वत:बरोबर घालवणं, त्यासाठी आयुष्याची घडी पुन्हा बसवणं, असा होता. त्यानं रोज सकाळी ध्यान करायला सुरुवात केली. त्यामुळे सुस्पष्ट विचार आणि एकाग्रता, यांसह दिवसाची सुरुवात होऊ लागली. संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर तो फेरफटका मारायला जात असे. या निमित्तानं दिवसभराच्या घडामोडींबद्दल शांतपणे विचार करायला त्याला वेळ मिळू लागला. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन या दोन्हींच्यामध्ये स्वत:साठी हवा असलेला मोकळा वेळ मिळू लागला. शनिवार-रविवार आधी म्हटल्याप्रमाणे स्वत:च्या छंदांसाठी आणि मित्रमंडळींसाठी राखीव ठेवलेले होतेच. यातून आयुष्याचा ताल आणि तोल उत्तम सांभाळला जाऊ लागला.


दैनंदिन जीवनात या चांगल्या सवयींचा समावेश केल्यामुळे कुणालच्या कार्यक्षमतेत वाढ झालीच, पण त्याचबरोबर त्याचं वैयक्तिक आयुष्यही तो अतिशय समाधानानं, तृप्ततेनं जगू लागला. यातून एक मोलाची शिकवण मिळते, ती म्हणजे जेव्हा आपण जीवनाचा वेग नियंत्रित करू, सावकाशपणे एकेक क्षणाची मजा अनुभवू, तेव्हा साहजिकच आपली निर्णयक्षमता सुधारते, अनावश्यक ताणतणाव कमी होतात आणि खोलवर समाधानाचा अनुभव येतो.


थोडक्यात, ‘सजग जीवन’ म्हणजे आतल्या, खऱ्या ‘स्व’ला प्रोत्साहित करणारे, उत्तेजन देणारे पर्याय जाणीवपूर्वक स्वीकारणं. यासाठी जीवनाचा वेग हळूहळू कमी करत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. शिस्तबद्धतेचा अंगीकार केल्यामुळे आणि आत्मचिंतनासाठी काही वेळ काढल्यामुळे आपण अधिक संतुलित आणि समाधानी आयुष्य जगू शकतो. त्यासाठी आपल्यावर कुठलं संकट येण्याची आणि त्यामुळे होणारे बदल अपरिहार्यतेनं स्वीकारण्याची मुळीच आवश्यकता नाही!


Loksatta/sanket@sanketpai.com

Ref: https://www.loksatta.com/chaturang/embrace-conscious-living-slow-down-and-find-balance-in-a-fast-paced-world-psg-98-4478267/

जिंकावे नि जगावेही : मीच लिहिले पत्र मला!

 जिंकावे नि जगावेही : मीच लिहिले पत्र मला!


‘अजून पाच वर्षांनी/ दहा वर्षांनी तुला स्वत:ला कुठे पाहायला आवडेल?’ असा प्रश्न शाळाकॉलेजच्या वयात, अगदी नोकरीच्या मुलाखतींमध्येही अनेकांना विचारला जातो. त्या वेळी आपण उत्साहानं कदाचित आपल्याला कधीच पेलवणार नाही असं उत्तर दिलेलं आठवत असेल तुम्हाला! आपण ठरवल्याप्रमाणे किती प्रत्यक्षात घडलं?… समजा, आता तुम्ही मध्यमवयीन किंवा प्रौढ असाल आणि तुम्हाला हाच खेळ उलट दिशेनं खेळायला सांगितलं, तर?..


कल्पना करा, की तुम्हाला दहा, वीस किंवा अगदी तीस वर्षांनी लहान असलेल्या तुम्हालाच भेटण्याची संधी मिळालीय! इतर कोणतीही विवंचना नसताना शांतपणे संवाद साधण्यासाठी काही तास… अशा वेळी ‘त्या’ तुमच्याशी तुम्ही काय बोलाल?…


या लेखमालेत आपण ‘सजगपणे जगणे’ या संकल्पनेविषयी बोलतो. त्या दृष्टिकोनातून या प्रश्नाचा विचार करून पाहा. केवळ आपण भूतकाळात जाऊन घडलेल्या गोष्टी बदलू शकत नाही, असं कारण सांगून उत्तर द्यायचं टाळू नका. असं समजा, की जणू या प्रश्नावर आपलं सबंध आयुष्य आधारित आहे. आता तुमच्या त्या ‘स्व’ला काय सांगाल तुम्ही? कशी मदत कराल त्याला? कोणता सल्ला द्याल? धाडस करणं, अंगी लवचीकता बाणवणं, आलेल्या चांगल्या संधीचा फायदा करून घेणं, याबद्दल काय सांगाल? मनात करुणा बाळगणं, प्रसंगी स्वत:बद्दलही सहानुभूतीपूर्वक विचार करणं, याचं महत्त्व कसं सांगाल तुम्ही स्वत:ला? आपल्या अस्तित्वाचा अर्थ कसा शोधायचा, ते कसं सांगाल?


ही गोष्ट मी स्वत:च्या बाबतीत करून पाहिली. विशीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या माझ्या ‘स्व’ला पत्र लिहायचं ठरवलं. गेल्या वीस वर्षांत मी गिरवलेले धडे, गाठीशी बांधलेले अनुभव, चोखाळलेल्या वाटा, प्रसंगी पत्करलेले धोके… सारं काही! हे ते पत्र-


प्रिय, विशीतला मी,


तुला ‘आजच्या मी’कडून खूप खूप प्रेम! मला खात्री आहे, की तू बरा असशील. स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांनी ओतप्रोत अशा तारुण्याच्या उंबरठ्यावर तू उभा आहेस, तेव्हा काही विचार, काही सल्ले द्यावेसे वाटले तुला! साहजिकच मागची अनेक वर्षं मी घेतलेले अनुभव, अनेकदा केलेलं गहन चिंतन, केलेलं धाडस, या सगळ्याचा तो परिपाक आहे. तुला मार्गदर्शन करणं, प्रेरणा देणं आणि जगाकडे, जगातल्या तुझ्या अस्तित्वाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचं आव्हान देणं, हाच यामागचा उद्देश.


अनुभव ‘निर्माण करावे’ लागतात! सरधोपटपणे आयुष्य जगू नकोस. उठल्यापासून झोपेपर्यंत तीच ती कामं करत राहणं म्हणजे आयुष्य नव्हे. खरं तर ज्वलंत अनुभवांनी, साहसांनी भरलेलं असायला हवं आयुष्य. चाकोरीबद्धतेतून, सुखासीनतेतून बाहेर पड आणि झोकून दे स्वत:ला सभोवतालच्या जगात. मग चांगला असो, की वाईट, प्रत्येक अनुभव हा एक रंजक कथा म्हणून तुला सांगावासा वाटेल! नेहमी लक्षात ठेव, की प्रत्येकाची आपली एक कथा असते. तुझी कथाही फक्त तुझी म्हणून अद्वितीय आहे. जगत असलेल्या प्रत्येक क्षणाशी तन्मय हो आणि त्या प्रत्येक क्षणातून तुझं संपन्न व्यक्तिमत्त्व आकाराला येऊ दे.


उत्सुक रहा, मन खुलं ठेव!


जे मर्यादित आणि संकुचित दृष्टिकोन अंगी बाणवत तू मोठा झालास, त्यापेक्षा हे जग फार मोठं, अपार वैविध्यानं भरलेलं आहे. कुटुंबानं किंवा समाजानं आखून दिलेल्या पारंपरिक वाटेवरूनच तू चालायला हवंस असं मुळीच नाही. नवनव्या संकल्पनांचा आणि विचारपद्धतींचा खुल्या मनानं स्वीकार कर. डीन ग्राझीओसी नामक उद्याोजक म्हणतो त्याप्रमाणे ‘जॅकेट अप्रोच’ स्वीकारायचा प्रयत्न करून बघ- म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन बघ आणि त्यातलं तुझ्यासाठी काय चांगलं आहे ते पहा. सवयीच्या, अंगवळणी पडलेल्या गोष्टींतून बाहेर पडायला अजिबात कचरू नकोस. दोन वर्षांनी जेव्हा तू अमेरिकेत जाशील, तेव्हा तू कधी कल्पनाही केली नसशील इतकी क्षेत्रं, त्यांतल्या उदंड संधी तुला दिसतील. जीवनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्ती तुला भेटतील. त्या प्रत्येकाचं कार्यक्षेत्र, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा इतक्या वेगळ्या असतील, की असं काही अस्तित्वात आहे, हे तुझ्या कदाचित गावीही नसेल. त्यामुळे तुझं कुतूहल नेहमी जागं ठेव. अपरिचित वाटांवरूनदेखील प्रवास आत्मविश्वासानं चालू ठेवण्याची प्रेरणा त्यातून तुला मिळत राहील.


निष्कारण घाई नको आयुष्यात निष्कारण घाई-घाई करू नकोस. स्वत:च्या चालीनं चाल. तुझ्या कुटुंबातल्या माणसांची आणि समाजाचीही नेहमी अशी अपेक्षा असेल, की तू यशाच्या मार्गावर भरधाव वेगानं पुढे पुढे जावंस. पण आयुष्य ही काही स्पर्धा नाही! काही लोक तुझ्या पुढे गेलेले दिसतील, तर काही तुझ्या मागे असतील, पण तुझा प्रवास हा तुझ्या एकट्याचा आहे. त्यामुळे तुला हवी ती गती पकड. प्रवासाची मजा घे. वर्तमानाचा आनंद घे. आयुष्यातल्या निरनिराळ्या पैलूंचा शोध घे, प्रत्येक क्षणाचा आस्वाद घे, तोही स्वत:च्या अटींवर! मुक्त श्वास घेण्यासाठी, घडणाऱ्या गोष्टींचा सखोल विचार करण्यासाठी आणि रोज सामोऱ्या येणाऱ्या लहानमोठ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आवर्जून वेळ काढ.


आयुष्यभर शिकत राहण्याचं महत्त्व ओळख!


औपचारिक शिक्षण महत्त्वाचं आहेच, पण केवळ त्यावरूनच व्यक्तीची किंमत ठरते असं मुळीच नाही. शिकायला, आधी शिकलेलं विसरून पुन्हा नव्यानं शिकायला नेहमी तयार राहा. पदव्यांवरून स्वत:ची व्याख्या करू नकोस आणि त्यानं स्वत:च्या अहंकाराला खतपाणीही घालू नकोस. उलट नवनव्या संधी निर्माण कर, त्याद्वारे जगात काही भरीव योगदान देण्यावर लक्ष केंद्रित कर. तुला येणाऱ्या अनुभवांमधून आणि पार केलेल्या आव्हानांमधून तू जे शिकशील, ते खरं! आयुष्यभराचा विद्यार्थी हो. नव्या ज्ञानाचा आणि नव्या दृष्टिकोनाचा खुल्या मनानं स्वीकार कर.


ध्येयांच्या बाबतीत लवचीक राहा प्रसंगानुसार तुझी ध्येयं बदलू शकतात आणि ती बदलतीलही. आणि हे अगदीच साहजिक आहे. कदाचित तू आता जे स्वप्न उराशी बाळगतोयस, त्यातून भविष्यात तुला काही समाधान मिळणार नाही. मी असं ध्येय ठरवलं होतं, की आपण एक सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करायची! त्या स्वप्नानं मी पुरी बावीस वर्षं झपाटलो होतो. पण भविष्यात माझ्या असं लक्षात आलं, की मी खरा कशात रमतो, तर सुमार दर्जात समाधान मानण्याच्या मानसिकतेतून लोकांना बाहेर काढण्यात… त्यांना चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करायला प्रवृत्त करण्यात! स्वप्नं आणि ध्येयं तुमच्याबरोबर प्रगल्भ होत जातात. तेव्हा जीवनाबद्दलची दूरदृष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न कर. सुरुवातीला ही दृष्टी खूप विस्तारित, ढोबळ स्वरूपाची असेल. पण हळूहळू ती नेमकी होत जाईल. मग कोणत्याही चाकोरीत न अडकता तू नवनव्या गोष्टी आत्मसात करत जाशील, तुझा परीघ विस्तारेल.


योग्य मार्गदर्शक शोध! सुरुवातीपासूनच तू तुला मार्गदर्शन करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या, तुझ्या क्षमतांना आव्हान देणाऱ्या लोकांच्या सान्निध्यात राहा. त्यांना जगातलं सर्व काही माहीत असलं पाहिजे असं मुळीच नाही, पण जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंच्या बाबतीत त्यांनी तुझ्यापेक्षा अधिक प्रगती केलेली असावी. वेगवेगळ्या विचारसरणीचे मार्गदर्शक हवेत. त्यामुळे तुझ्या विचारांच्या कक्षा रुंदावतील, नव्या शक्यताही निर्माण होतील. जसजसा तू मोठा होशील, तसे तुझे मार्गदर्शकही बदलतील. तुझा पुढे पुढे प्रवास सुरू आहे, याचंच हे द्याोतक आहे.


नात्यांची बाग फुलव आयुष्य काही एकट्यानं जगण्यासाठी नाहीये. अर्थपूर्ण नाती निर्माण कर आणि ती जप. नात्यात व्यवहार नसतो. निखळ आनंदाचा आणि सुदृढ आयुष्याचा पाया म्हणजे नातं. लहानशा रोपट्याचं सावली देणाऱ्या घनदाट वृक्षात रूपांतर होण्यासाठी तू जशी मेहनत घेशील, तशीच मेहनत नात्यांची जोपासना करण्यावर घे. तत्काळ हवं ते देणाऱ्या गोष्टींचा मोह टाळून नेहमी प्रदीर्घ काळासाठीच्या नात्यांना प्राधान्य दे. तुझ्या जवळची माणसं तुला आधार देतील, आनंद आणि मार्गदर्शन देतील. ती तुझं जीवन अधिक संपन्न आणि अर्थपूर्ण व्हायला मदत करतील.


हाती आलेली संधी घ्यायला शीक! अपयशाचा किंवा अन्य कशाचा शिक्का आपल्यावर बसेल या भीतीनं कधी मागे हटू नकोस. अनेकदा अपरिचित गोष्टी करून पाहण्याचं धाडस दाखवल्यानं आपल्याला भरघोस काहीतरी मिळून जातं. मग ते स्वप्नांचा पाठपुरावा करणं असो, पूर्वी आपण जिथे गेलो नाही अशा परदेशात प्रवास करणं असो किंवा संपूर्णपणे नवीन काही तरी करणं… अनुभव नेहमी तुला समृद्ध करतील, तुझा आत्मविश्वास वाढवतील. अनिश्चिततेचा स्वीकार करत जागरूकतेनं, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जोखीम पत्करण्याची तयारी ठेव. तुला असं आढळेल, की ज्या क्षणी आपल्याला सर्वांत जास्त असुरक्षित वाटत असतं, अशा क्षणातूनच आपण खूप शिकत असतो, विकसितही होत असतो.


बदलांचा स्वीकार कर!


आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. पण बदल हाच जीवनाचा स्थायिभाव! त्यामुळे बदलाला विरोध करण्यापेक्षा त्याचा स्वीकार कर, त्याची मजा घे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नव्या संधी, नवी आव्हानं उभी असतात. बदलाचा सहर्ष स्वीकार केल्यानं पूर्वी आलेल्या अपयशातून विकासाच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. अपेक्षित किंवा अनपेक्षित, कोणत्याही बदलामध्ये नव्या शक्यतांचं बीज दडलेलं असतं हे लक्षात ठेव.


आत्मचिंतनाला प्राधान्य दे!


तुला आलेल्या अनुभवांचा बारकाईनं, सखोल विचार कर. त्यातून शीक आणि भविष्यासाठी नवी ध्येयं ठरव. स्वत:चा विकास हा एक निरंतर प्रवास आहे. त्यातून अधिकाधिक प्रगल्भ होत जाणं, दिवसागणिक आपलं व्यक्तिमत्त्व आणखी विकसित करण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं! तुझी बलस्थानं, उणिवा आणि महत्त्वाकांक्षा नीट समजून घे. स्वत:बद्दलची जागरूकता हा तुझ्या निरंतर होणाऱ्या विकासाचा पाया असेल.


पुढच्या प्रवासाला तू खुल्या मनानं, साहसी वृत्तीनं सुरुवात करावीस यासाठी तुला उद्याुक्त करणं हेच इथे माझं काम होतं! जगात असंख्य शक्यता, असंख्य संधी आहेत. तसंच तुझं जीवनही त्यातल्या अनपेक्षित कंगोऱ्यांसह अद्वितीय सुंदर असो! जे समोर येईल त्या साऱ्याचा स्वीकार कर. तुला वाटतं त्यापेक्षा तू खूप जास्त खंबीर, जास्त सक्षम आहेस!


तुझ्यातल्या ‘लढवय्या’साठी…


तुझ्या भविष्यातला ‘मी’!


हे तर झालं मी मला लिहिलेलं पत्र! आता तुमची पाळी. सांगा… तुम्हाला तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या ‘स्व’ला पत्र लिहायची संधी मिळाली, तर काय लिहाल?…


Loksatta/sanket@sanketpai.com

Ref: https://www.loksatta.com/chaturang/loksatta-chaturang-letter-dialogue-live-concept-point-of-view-amy-95-4451431/

Monday, December 19, 2022

उपयोगी मंत्र

उपयोगी मंत्र

ज्यांनी कोणीही हे मंत्र संकलन केले असेल त्यांचे आपल्या सर्वांकडून आभार! 🙏

(1) *अन्नाचा दृष्टी दोष घालवण्याचा मंत्र* (एकदाच म्हणावा)

अन्नं ब्रम्ह रसो विष्णूर्भोक्ता देवो महेश्वराः।

इति संचित्यं भुंजानं दृष्टी दोषो न बाधते।।

(2) *जेवणास सुरूवात करण्या आधी म्हणावयाचा मंत्र* —

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे।

ज्ञान वैराग्य सिदध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती।।

(3) *जेवणापुर्वी म्हणण्याचा असाच एक गीतेतील श्लोक* —

ब्रम्हार्पणं ब्रम्ह हविः ब्रम्हाग्नौ ब्रम्हणाहुतम्‌।

ब्रम्हैव तेन गंतव्य ब्रम्ह कर्म समाधिना।। 

(4) *नेत्र विकार होऊ नयेत म्हणून जेवण झाल्यावरचा मंत्र* — 

स्वर्यातिंच सुकन्यांच च्यवनं शक्रमश्विनौ।

भोजनान्ते स्मरेद यस्तु तस्य चक्षुर्न हीयते।।

(हात धुतल्यावर ओल्या हाताने दोन्ही डोळ्यांवर अल्प घर्षण करून पाणी लावावे, नेत्र चांगले राहतात)

(5) *भोजन झाल्यावर योग्य रितीने अन्न पचन व्हावे म्हणून जेवणानंतर मंत्र म्हणत पोटावरून हात फिरवावा.*

अगस्त्यं कुंभकर्णं च शनिं च वडवानलं।

आहार प्रति पाकार्थम्‌ स्मरामि च वृकोदरम्‌।।

अतापि भक्षितो येन वातापीच महाबलः।

अगस्तस्य प्रसादेन भोजनं मम जीर्यताम्‌।।

(श्रद्धा हवी तर या मंत्रांचा अनुभव येतो)

(6) *लहान मुलांना नजर, दृष्ट लागते त्यावर मंत्र*— 

अंजनी गर्भ संभूतं कुमारं ब्रम्हचारिणम्‌।

दृष्टी दोष विनाशाय हुनुमंतं स्मराम्यहम्‌।।

(7) *गाढ निद्रा येण्यासाठी, झोपताना खालील मंत्र म्हणावा* — 

अगस्तीर्माधवश्चैव मुचकुन्दो महाबलः।

कपिलो मुनि रास्तिकः पंचैते सुख शायिनः।

(8) *वाईट स्वप्ने पडू नयेत या साठीचा मंत्र —* 

(झोपण्या अगोदर म्हणावा)

अच्युतं केशवं विष्णुं हरि सोम जनार्दनम्‌।

हंसं नारायणं कृष्णं जपेत्‌ दुःस्वप्न शान्तये।।

(09) *घराबाहेर पडल्यानंतर, घरी परत येईपर्यंत रक्षण व्हावे यासाठी मंत्र —* 

वनमाली गदी शारंगी शंखी चक्रीय नन्दको।

श्रीमान्‌ नारायणो विष्णूर्वासुदेवो भिरक्षतु।।

(ह्यातील मंत्र नंबर -५ चा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला आहे काही वर्षांपूर्वी. जास्त जेवल्यावर जर पोट दुखत असेल तर तो मंत्र पोटावरुन हात फिरवत किमान ५ वेळा म्हणावा म्हणजे पचन नीट होते, गॅस निघून जातो.) 

Monday, August 1, 2022

अलिप्त होण्यातलं सुख

अलिप्त होण्यातलं सुख
       
      लहानपणी गौरी गणपतीच्या दिवसांत पारिजातकाच्या झाडाखालची पांढरीशुभ्र, शेंदरी देठाची फुलं वेचताना आमची तारांबळ उडत असे. कोणाच्या परडीत, कमी वेळात जास्त फुलं जमतात, ह्याची जणू चढाओढच लागत असे. 'माझी परडी', 'माझी फुलं' ह्या' मी' पणाचा भारी अभिमान वाटे.

      एकदा का ही फुलं देवाच्या चरणी अर्पण केली की मात्र ही फुलं, 'माझी फुलं' रहात नसून 'त्याची फुलं' होऊन जात. निर्माल्य होईपर्यंत ती त्याचीच फुलं बनून रहात. फुलांद्वारे 'मी पणा' देखील नकळत देवाला अर्पण होत असे.

      खरंच, किती क्षणिक असते, मी पणाचे सुख! कळ्यांची फुलं होताना, ती अंगाखांद्यावर खेळवताना तो पारिजातकही अभिमानाने म्हणत असेल, 'माझ्या कळ्या' , 'माझी फुलं'. पण एकदा का ही फुलं धरतीला अर्पण केली की होतोच की तोसुद्धा मीपणातून मुक्त!
     
    आयुष्य देखील असंच असतं. ह्या क्षणभंगुर आयुष्यात माझं घर, माझे कपडे, माझे दागिने, हे किती काळ आपण मिरवणार असतो?

    एकदा का आपला नश्वर देह अनंतात विलीन झाला की ह्या माझेपणावर आपला काहीही हक्क उरत नाही. 

    हे सगळं तत्त्वज्ञान माहीत असूनही आयुष्यात माझेपणाच्या मिठीतून केवळ वस्तूंनाच नव्हे, तर व्यक्तिंनादेखील सोडणं जमत नाही.

       मुलाचं लग्न झालं, तरी आईला स्वतःला मुलापासून अलिप्त करता येत नाही. 'तिचं घर', 'तिचा मुलगा', 'तिचा संसार' सुनेच्या ताब्यात सोपवणं तिच्या 'पझेसिव्ह' स्वभावाला जमत नाही. 

सुनेचं स्वतःच्या वेळेनुसार उठणं, स्वतःच्या वेळेनुसार घर आवरणं सासूला बघवत नाही. सासूचा जीव स्वतःच्या संसारात गुंतलेला असतो. सासरच्या पद्धतीच नवीन सुनेने अंगीकाराव्यात अशी तिची मनोमन इच्छा असते.

    वडील जेव्हा आपल्या व्यवसायात मुलाला सामावून घेतात, तेव्हा त्यांच्या पद्धतीनेच मुलाने व्यवसाय करावा असं त्यांना वाटतं. मुलाला त्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यवसायाचा विस्तार करु देण्याइतकं अलिप्त त्यांना होता येत नाही.

      आयुष्य जसं जसं पुढे जातं, तसा माणूस त्यात अधिकाधिक गुंतत जातो. गुंतण्यामुळेच कलह निर्माण होतात. सासू सुनेचं पटत नाही, बाप लेकात मतभेद होतात, आई मुलांत वाद होतात. आणि ह्या सर्व संघर्षांचं मूळ कारण असतं, 'गुंतणं'.

    आयुष्यात 'सोडणं 'जमलं पाहिजे. केवळ वस्तू अन् व्यक्तीच नव्हे, तर दुःख, भीती, यातना, वाईट आठवणी सुद्धा सोडता आल्या पाहिजेत.

    फुलं ज्याप्रमाणे परमेश्वर चरणी अर्पण केल्यावर ती त्याची फुलं होतात, त्याप्रमाणे दुःखसुद्धा परमेश्वर चरणी अर्पण करून आपल्याला त्यातून रितं होता आलं पाहिजे.

    आयुष्य सुखदुःखाची झोळी आहे. दुःखं गाळता आली पाहिजेत. दुःखांना 'डिलीट' करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. लोभ, मोह टाळता यायला हवेत. आशेपासून दूर रहाता आलं, तर निराशेचं दुःख पदरी पडत नाही.

      साध्या साध्या गोष्टीतून देखील मोह सुटत नाही. माझ्या फेसबुक पोस्टला 'लाइक' केलं पाहिजे. 'व्हाॅट्स ॲप पोस्टवर कॉमेंट टाकली पाहिजे. माझ्या जवळच्या लोकांनी माझी पोस्ट शेअर केली पाहिजे असा हट्ट, माझ्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे हा आग्रह, मी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे अशी इच्छा, अशा सगळ्या अपेक्षांना जेव्हा पूर्णविराम देता येईल, तेव्हा आपल्याला खऱ्या दृष्टीने अलिप्त होता आलं, असा त्याचा अर्थ होईल.
    
अलिप्त होण्याचा प्रयत्न करुन तरी बघा. मनातील सारं मळभ निघून जाईल.

कोसळून मोकळ्या झालेल्या निरभ्र आकाशासारखं  मनदेखील स्वच्छ, सुंदर होईल, ज्यात दुःखद आठवणींचे काळे ढगही नसतील किंवा मोहमयी पांढरे ढग देखील नसतील. 

    रिक्त होण्यातही सुख आहे. आपलं जीवन कोणाच्या तरी उपयोगी पडतंय, ही भावनाच खूप सुखावह आहे. पारिजातकाचं झाड तेच तर सुचवतंय. 

अगणित फुलांचं दान अर्पित करून, परत नव्याने बहरण्यासाठी सज्ज होतोच की बापडा... अगदी रोज... कोणत्याही पाशात न अडकता... अलिप्तपणेच!

🙏🙏🌹💞🌹🙏🙏

Wednesday, June 8, 2022

अट्टहास

*मला माझ्याच हातचं आवडतं बाई, माझ्यासारखं चविष्ट नाही होत कोणाचं, असं स्वतःचं म्हणून ती रांधत बसते..*
*माझ्या सारखं स्वच्छ नाही बाई कोणी, मला मीच पुसलेली फरशी आवडते भारी, असं म्हणून ती राबत बसते..*
*माझ्या शिवाय मुलांचं पान नाही हालत, म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातात देत, ती मुलांचं करण्यातच गुंतत बसते..*
*जोपर्यंत हा अट्टहास स्त्री सोडत नाही तोपर्यंत ती सुखी होऊ शकत नाही.!! तुमच्या या अट्टाहासा पायी तुम्ही कित्येकदा तुमच्या जवळच्या, तुमच्या मदतीला उभ्या असलेल्या 'स्त्री'ला नाकारता आणि नकळत तिचा अनादर करता आणि कायमचा एक मदतीचा हात, एक नात्याचा बंध, एक भावनिक आधार गमावून बसता.! प्रत्येक स्त्री नव्हे, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. प्रत्येकाचे गुण, कला, आवड-निवड ही वेगवेगळी असतें,*
*त्यामुळे एकमेकींना त्यावरून नावे ठेवणे सर्व स्त्री वर्गा ने बंद केले पाहिजे,*
*नसेल तिच्या घरात स्वच्छता फार, पण सुंदरता तिच्या मनात असेल, स्वभावात असेल,*
*तिच्यात अन्नपुर्णा नसेल, पण सरस्वती असेल..*
*तिच्यात सरस्वती नसेल तर लक्ष्मी असेल..*
*तिच्यात खुप कला नसतील कदाचित, पण ती स्वयंपाकात निपुण असेल,*
*एखादीला नसेल येत घरातलं काम, पण अभ्यासात अव्वल असेल कदाचित,*
*एखादी शब्दात रमणारी असेल, एखादी सुरेल असेल, एखादी नाटकात कमाल असेल. एखादी नखशिखांत "कलाकार" असेल..*
*त्यामुळे आपण या गुणांतल्या भिन्नतेचा मनापासुन स्वीकार करुन नातं पुढे नेलं तर नात्यांमध्ये खुप सुंदरता येईल, सहजता येईल.!! स्वतः मध्ये जे आहे.* *"ते" च दुसऱ्या मध्ये शोधण्याचा अट्टहास बंद करा आणि त्याच्या मध्ये "जे" आहे त्याचा आदर करा.. तेंव्हा तुम्हाला नात्यातलं खरं सुख गवसेल.! आणि तुमच्या चेहऱ्यावर खरं हास्य फुलेल..!*
*समस्त "स्त्री वर्गास" समर्पित.🙏🏻🏵️🌹🏵️🙏🏻*

नांदत्या घराची किंमत

*नांदत्या घराची किंमत*
*******************

दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात. 

त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले. वाटलं, कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते.

7.30 ला मोबाईल वरून फोन आला. जरा थकलेला, पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता. "मी आलेय फोटो घेऊन. डेक्कनच्या बस स्टॉप वर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का?" 

अरे बाप रे ..एवढ्या वयस्क आजी. मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला. झक्कपैकी टू व्हिलर वर बसून आजी आल्या. फिकटस नऊवारी पातळ , सुपारीएवढा अंबाडा, हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात. 

ब्रेकफास्ट ची वेळ होती. नवरा ग्राऊंडवरून 10 मिनिटात येणार होता . मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती. मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती . लेक पसार झाली काहीतरी काम काढून . 

शेवटी मी डाईनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली . माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या," मी करते ग पोहे , तू निश्चिनतीने फोटोचे काम हातावेगळे कर ." मी जरा संकोचले पण पर्याय नव्हता म्हणून तेथून बाजूला झाले . माझे काम होस्तोवर पोहे तय्यार .
भरपूर ओला खोबरं आणि कोथिंबीर घालून आजीनी मस्त पोहे केले होते . हक्कानी पापड मागून घेतले . मी भाजते म्हंटलं तर म्हणाल्या " थांब मी तळते कि ".

एव्हाना लेक आणि नवरा घरी आले आणि आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायला घेतला .आजींच्या हातचे चविष्ट पोहे खाऊन घरातले खुश . जाते जाते म्हणत आजी जेवण करूनच निघाल्या इतका आग्रह माझ्या माणूसवेल्हाळ लेकीने आणि नवऱ्याने त्यांना केला . आणि आजीने पण खान्देशी भरीत करून त्यांच्या आग्रहाला पोच दिली.

निघताना मी जरा संकोचून आजींना म्हंटले , " आजी खूप त्रास घेतलात हो ."
आजी जे उतरल्या त्यात समाधान होते आणि वेदनाही . 

त्या म्हणाल्या "नांदत्या घरात खूप दिवसांनी वावरले,अगदी स्वयंपाकघरातही हक्क दाखवला...खूप छान वाटलं ग "

या एका वाक्यात मीच रडवेली झाले . 

"पुन्हा याल ना ? " त्या उत्तरादाखल किंचित हसल्या अन म्हणाल्या "परमेश्वराची इच्छा".

खरा सांगू .. सणासुदीला पाव्हण्यारावळ्यांचा मर्यादेपेक्षा जास्त राबता झाला कि मी जरा वैतागायचे..... आजींच्या " नांदत्या " या एका शब्दाने मला ती किंमत कळली .

🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

Sunday, December 12, 2021

मना सज्जना...

मना सज्जना...

लहानपणी शुभंकरोति, मनाचे श्लोक, रामरक्षा अशा गोष्टी आपण म्हणतच असतो. त्या नित्य पठनात असतात. कदाचित लहान वयात पाठ झाल्यामुळे त्या दीर्घकाळ लक्षातही राहतात. अर्थात हे पूर्वीचे अनुभव आहेत. आपण आता त्या संस्कारक्षम परिपाठाला कालबाह्य ठरविले आहे. काही गोष्टींवर धार्मिकतेचा, आध्यात्मिकतेचा शिक्का मारून त्या बाजूला ठेवण्याची आपली एक नवीनच आधुनिक (?) जीवनशैली सुरू झाली आहे. बरे, आपण त्याला काही नवीन पर्याय शोधले काय, तर तसेही नाही. 27 नोव्हेंबरच्या लेखांकात आपण मनाचे श्लोक, गीता अशा गोष्टींचे लहानपणापासून पाठांतर असेल तर पुढे जीवनात विविध प्रसंगी त्या समृद्ध पाथेयाचा कसा उपयोग होतो, याचा थोडा विचार केला आहे. खरे तर मनाच्या श्लोकांचा फार आध्यात्मिक खोलात न शिरता अगदी लौकिक, व्यावहारिक दृष्टीने विचार केला तरीही मनाला समर्थ करणारी ती उपासना आहे, हे कळल्याशिवाय राहात नाही. अर्थात प्रपंच आणि परमार्थ असा भेद समर्थांना मान्य नाही. जीवन एकात्म असतं. त्यामुळे असा भेद करताच येत नाही.
मनाच्या श्लोकांच्या पहिल्याच श्लोकांत समर्थ आपल्या डोळ्यासमोर एक ध्येय ठेवतात. कोणत्या मार्गाने जायचं आहे, हे ते मनाला सुचवतात. ‘गमू पंथ आनंत या राघवाचा’ अशी आपल्या मनाला ते स्पष्ट सूचना देतात. हा मार्ग ‘आनंत’ आहे, म्हणजे काय? हा मार्ग व्यापकतेकडे, विशालतेकडे नेणारा आहे. ‘छोटे दिलसे कोई बडा नहीं हो सकता. टुटे दिलसे कोई खडा नहीं हो सकता।’ 

माणसांमध्ये विकासाच्या अनंत शक्यता असतात, हे कळले म्हणजे मन छोटेही राहात नाही आणि एखाद्या क्षुल्लक कारणामुळे खचतही नाही. अनंताच्या मार्गावर चालताना आपल्याच संकुचित सीमा तोडाव्या लागतात, मर्यादा ओलांडाव्या लागतात, झापडं काढावी लागतात, दृष्टिकोन व्यापक करावा लागतो. ‘अनंत’ या शब्दातच व्यापक होण्याची प्रक्रिया सामावलेली आहे. त्याकरिता राघवाचे विशाल रूप जाणून घेतल्याशिवाय संकुचित भाव नाहीसा होतच नाही. म्हणूनच रामाची विविध रूपं विभिन्न श्लोकांमधून मनावर ठसविण्याचा समर्थ प्रयत्न करतात. समर्थांचा राम कोदंडधारी आहे. त्याला पाहून काळही थरारतो. तो पूर्ण प्रतापी आहे, सर्वगुणी आहे, एखाद्या शिलेप्रमाणे जीवन झालेल्या निराश अहल्येमध्येही त्यांनी चैतन्य निर्माण केलं. तो दीनानाथ आहे, निर्भय आहे, ब्रिदाचे रक्षण करणारा आहे. विवेकी आहे. अनंत शब्द कळला नाही तर माणसं कर्मकांड, पूजा, विधीपर्यंतच मर्यादित राहतात. राघव मार्गावर चालताना हे भान आवश्यकच आहे.

हा मनासोबत सुरू असलेला संवाद आहे. ‘मना सज्जना भक्तिपंथेची जावे’ या दुसर्‍या श्लोकात दोन महत्त्वाची सूत्रं आहेत. समर्थांनी मनाला अनेक श्लोकांमध्ये वारंवार ‘सज्जन’ म्हणूनच संबोधले आहे. आपण बाहेर काय दाखवतो यापेक्षा आपण आपल्याला मनातून काय समजतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. डॉ अल्बर्ट एलिस एक जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या एका पुस्तकात ते काय म्हणतात पहा, ‘‘स्वत:ला ‘चांगला माणूस’ समजा. (समर्थांच्या भाषेत सज्जन) कारण तुमच्या सुखी, कार्यक्षम जगण्याला ते उपकारक ठरतं. आणि तरीही समजून घ्या की, ते तुमचं मूल्यांकन चूक असू शकतं. कारण कधी कधी तुम्ही वाईट वागू शकता आणि वेगवेगळ्या स्थळी आणि काळी ते सुसंगत असेलच असे नाही. स्वयंमूल्याची समस्या त्यामुळे सोपी होते इतकेच. (आपले दोष, चुका, मनाच्या वाईट सवयी, नकारात्मक भावनांच्या आहारी जाणे, अशा अनेक दोषांची जाणीव समर्थही अनेक श्लोकांतून करून देतात.) स्वत:ला सांगत राहा की, मी एक चांगला माणूस आहे. माझं अस्तित्व मला समृद्ध करायचं आहे. माझं अस्तित्वच मला ‘चांगलं माणूसपण’ बहाल करतं. (देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी।)’’ (‘मन कराया प्रसन्न’ या अनुवादित पुस्तकातून. कंसातील मजकूर पुस्तकातील नाही.) 

समर्थही मानसशास्त्राच्या भूमिकेतून विचार करतात, हे या उतार्‍यावरून स्पष्ट होते. कोणताही माणूस पूर्णपणे वाईट िंकवा पूर्णपणे चांगला नसतो. एखादे विशिष्ट वागणे म्हणजे संपूर्ण ‘मी’ नाही, हे समजून घ्यावे लागते. माणसात बदल करण्याची क्षमता असते. तो चांगला असतो म्हणूनच स्वत:ला बदलण्याचा विचार त्याच्या मनात येतो. म्हणूनच स्वत:ला सज्जन समजणे, म्हणजे प्रामाणिकपणे स्वत:ला स्वीकारणे आणि बदलाकरिता स्वत:ला तयार करणे. स्वत:ला सज्जन समजण्यात खोटेपणा नाही. दंभ, दांभिकता मुळातच असता कामा नये, असे समर्थ वारंवार बजावतात. तसेच स्वत:ला अतिचांगलं समजणं, मोठं समजणं अशा प्रकारचा अहंभावही त्यात नको. या अहंभावात न कळत माणूस दुसर्‍याला कनिष्ठ समजतो. हा अहंकार दु:खाचे कारण असतो. त्याचाही स्वत:च शोध घ्यायला समर्थ सांगतात. ‘अहंतागुणे सर्वही दु:ख होते’ ‘अहंता तुझी तूचि शोधूनि पाहे’ अशा शब्दात मनाला ते प्रोत्साहित करतात. दुसरीकडे मनातच न्यूनगंड असेल, माणूस स्वत:लाच मनातून कमी लेखत असेल, वाईट समजत असेल तर बदलाची शक्यताच नाही. मनातून पराभूत होणं सर्वात घातक असतं. म्हणूनच ‘मना सज्जना’ असे संबोधून समर्थ आत्मविश्वास वाढवतात. 

हीन, दीन, दुर्बळ, भयभीत असणं समर्थांना मान्यच नाही. ‘नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे’ भक्त दैन्यवाणा असूच शकत नाही. ‘हरिभक्त वीरभक्त विज्ञानराशी, जेणे मानसी स्थापिले निश्चयाशी।’ असेही ते म्हणतात. त्यांची भक्त संकल्पना, वीरतेशी, ज्ञानाशी, निश्चयाशी जोडलेली आहे.
‘मना सज्जना भक्तिपंथेची जावे’ या ओळीतील ‘सज्जना’ या पहिल्या सूत्राची आपण चर्चा केली. या श्लोकात ‘भक्तिपंथेचि जावे’ हे दुसरे महत्त्वाचे सूत्र समर्थ मनाला सांगतात. आजकाल आपण भक्ती शब्दाचा संबंध अंधश्रद्धेशी जोडतो आणि दुर्दैवाने भक्तीमध्ये असलेल्या ‘भावना’ या शक्तीकडे दुर्लक्ष करतो. भक्ती हा भावनांचे नियमन करण्याचा सशक्त मार्ग आहे. कळते पण वळत नाही, असे आपण म्हणतो. या वळण्याचा संबंध भावनेशीच असतो. मनाची ओढ भावनेवरच अवलंबून असते. प्रबळ, उत्कट भावना असल्याशिवाय एखादी गोष्ट आपण पूर्णपणे झोकून देऊन करूच शकत नाही. यशस्वी होण्याच्या मार्गातल्या मुख्य अडचणी भावनांमुळेच निर्माण होतात. भावनाच माणसाला दुर्बळ करतात, हळव्या बनवतात, विचलित करतात. माणसामध्ये उत्क्रांतीच्या प्रवाहात अनेक प्रकारच्या भावना निर्माण झाल्या. त्यांच्या परिणामांवरून आज आपण नकारात्मक भावना व सकारात्मक भावना असा भेद करतो. जेव्हा आपण शुद्ध भक्तीचा मार्ग स्वीकारतो तेव्हा सकारात्मक भावनांचे पोषण करीत असतो. 

आपण स्वीकारलेल्या मार्गावर, ध्येयावर, आदर्शांवर आपली भक्ती असते, त्याच वेळी यशाच्या शक्यता निर्माण होतात. भक्तीमुळेच तन्मयता आणि एकाग्रता प्राप्त होते. भक्ती माणसाला खंबीर, अविचल बनवते. भक्तीमुळेच संकटांवर व अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य येते. जो विभक्त नाही, तो भक्त. भक्ती माणसाला ध्येयाशी जोडते. भक्तीमध्ये कोणत्या भावना असतात? भक्तीमध्ये असते प्रेम, तादात्म्यता, समर्पण, निरहंकारिता. आणि याच भावना यशाकरिता, आनंदाकरिता, विकासाकरिता आवश्यक असतात. अहंकारातच अनेक नकारात्मक भावनांचा उगम असतो. मत्सर, लोभ, क्रोध अशा भावनांची तीव्रता वाढली तर दु:ख, अशांती, अस्वस्थता, नैराश्य वाट्याला येते. यापासून दूर राहण्याचा सल्ला समर्थ पुन्हा पुन्हा देतात. सर्वोत्तम दासाकडून या गोष्टी अपेक्षितच नाहीत, हे मनाला ते सतत सांगत असतात.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनांचा पाठिंबा असल्याशिवाय विचारांचे रूपांतर कृतीत िंकवा वर्तनात होत नाही. आपल्या भावना, विचार आणि कृती यात विसंगती असते. हे ऐक्य साध्य करणे कोणत्याही उद्दिष्ट्यपूर्तीकरिता आवश्यक असते. भक्ती म्हणजे विचारांच्या मागे भावनेचे सामर्थ्य उभे करणे. समर्थ फक्त भक्तिपंथाचा सल्ला देऊन थांबत नाहीत. ‘जनी जाणता भक्त होऊनि राहे।’ असे म्हणून ते जाणता भक्त, ज्ञानी भक्त होण्याच्या मार्गाकडे मनाला नेतात. आणि ‘जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा’ असा मापदंडही सांगतात. मनाच्या श्लोकात ‘विवेक’ हा शब्द सर्वाधिक वेळा आला आहे. विवेकनिष्ठ विचारपद्धतीचा ते वारंवार पुनरुच्चार करतात. ‘धरा जानकीनायकाचा विवेकू’ ‘बोलण्यासारखे चाल बापा’ ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ असे मनाला समर्थ सतत आवाहन करीत असतात. ‘जनी बोलण्यासारिखे आचरावे, क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे।’ अशा श्लोकांमधून विचार, भावना आणि कृती यांचे ऐक्य असलेला हा भक्तिपंथ आहे, हे स्पष्ट करतात. खरे तर या तीनही गोष्टींमध्ये एकत्रित तसेच वेगवेगळे बदल घडवून आणणे म्हणजेच ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा विचार करणे. आध्यात्मिक परिभाषा वापरली की, आपल्याला ते कठीण वाटायला लागते.

‘मना सज्जना....’ या ओळीत मनाच्या प्रशिक्षणाची ‘सज्जना’ आणि ‘भक्तिपंथेचि जावे’ ही दोन महत्त्वाची सूत्रे दिल्यानंतर सज्जन कोण, हेही समर्थ याच श्लोकात स्पष्ट करतात. ‘जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे।।’ जनी याचा अर्थ समाजात. कोणत्याही समाजात नीतिनियमांचे काही मापदंड प्रस्थापित झालेले असतात. सज्जनशक्तीच्या आधारावरच खरे म्हणजे सामाजिक जीवन चालत असते. समाजात जे िंनदनीय असते ते सर्व सोडून द्यावे आणि जे वंदनीय असते ते करावे. िंनदनीय गोष्टींकरिता समर्थ ‘सर्व’ शब्द वापरतात. 

आपल्याला एखाद्या गोष्टींचा अपवाद करण्याची सवय असते. ‘चलता है’ हा आपला स्वभाव असतो. पण समर्थांचा सर्व गोष्टी सोडण्यावर कटाक्ष आहे. सज्जन माणसांचं समाजात अनुकरण होत असतं. वाईट गोष्टी माणसं सहजपणे स्वीकारतात. पण चांगल्या गोष्टींचे अनुकरण तितक्या सहजपणे होत नाही. सज्जनांनीच मापदंड पातळ करायला सुरुवात केली तर समाजावर त्याचे परिणाम होणारच आहेत. दुसरीकडे वंदनीय गोष्टींसाठी समर्थ ‘सर्व भावे’ असे विशेषण वापरतात. याचा अर्थ वंदनीय गोष्टी मनापासून केल्या पाहिजेत. कायदा पाळावाच लागतो म्हणून पाळणं आणि मनापासून पाळणं, यात फरक आहे. वाहतूक नियमांच्या बाबतीत आपण पाहतोच. सज्जनांचा तो स्वभाव असला पाहिजे. सज्जन माणसांच्या अनेक गुणांविषयी वेगवेगळ्या श्लोकांमध्ये विभिन्न पद्धतीने समर्थ मनासोबत संवाद करतात. 
मना सज्जना येक जीवी धरावे
जनी आपुले हित तूवा करावे।
रघुनायकावीण बोलो नको हो
सदा मानसी तो निजध्यास राहो।।

एक गोष्ट ते मनात पक्की धरून ठेवायला सांगतात. ते म्हणजे समाजात आपले हित तुला करून घेता आलेच पाहिजे. एकदा राघवमार्ग स्वीकारला आहे ना? मग आता अन्य गोष्टी बोलण्यात वेळ घालवू नको. अशानेच मग ध्येयाला अनेक फाटे फुटतात. मनात सदैव आपल्या ध्येयाचाच निजध्यास घे. सज्जन माणसाला आपले हित साधता आलेच नाही, तोच अपयशी झाला तर सज्जनपणाला अर्थ काय? अशाने सज्जनपणावरचा विश्वास उडणार नाही काय? हा श्लोक कितीतरी अर्थांची वलयं मनामध्ये निर्माण करतो. हेच मनाच्या श्लोकांचे सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याचे अनेक पैलू आहेत. आणखी काही पैलूंचा विचार पुढील लेखांकात करू.

रवींद्र देशपांडे
8888803411
दैनिक तरुण भारत, नागपूर

माणुसकी...

*आपलं यश डोळे भरून....*
*बघणारी माणसं हवीत......* 

दुसऱ्या साठी करताना सुद्धा ........ 
आपल्याला झेपेल इतकंच करावं..
अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना .....
अनेकांसाठी बरंच काही करतो..झटतो.........  
प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून...... 
कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो....
कोणताही स्वार्थ नसतांना.. 
मतप्रवाह तर दोन्ही बाजूंनी असतात..... 
ज्याच्यासाठी करतो त्याला वाटतं ........ 
केलं आमच्यासाठी तर काय फरक पडतो..
त्यांचं कर्तव्यच आहे..

करणाऱ्याचा हेतू स्वच्छ असतो.. 
आपल्या प्रयत्नाने कुणाचं तरी भलं व्हावं.....  
हा निर्मळ प्रयत्न असतो......... 
गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो....... 
तो या निर्मळ भावनेलाच धोका निर्माण करतो...

ज्याला समजून घ्यायचंय ...... 
तो समजूतदारपणे गोष्टी हाताळतो...
ज्याला समजून घ्यायच॔च नाही ...... 
तो शब्दाचा किस पाडतो...
शब्दांनी घायाळ करतो...

नात्यांची खरी मेख तर इथेच आहे...
माझं माझं करता करता ...... 
आपण आपल्यांना दुखावतो........ 
घालून पाडून बोलतो.......... .
परिणाम फक्त वाईटच होतात...
संबंध दुरावले जातात..... 
आपुलकीतला रस संपत जातो...
उरते ती फक्त निराशा...

हल्ली तर नाती आर्थिकदृष्टीतच बांधलेली दिसतात..
जणू पैसा म्हणजे सर्वस्व...
अमक्याने अमक्या कार्यक्रमात ....... 
आहेर दिला नाही म्हणून राग...
रस्त्याने जाताना ओळखीचे बोलले नाही हा राग...
एखाद्या प्रसंगांत मागे उभे राहिले नाही म्हणून राग...

निर्व्याज प्रेम .. जिव्हाळा.. काळजी.. कुटुंबातील प्रेम 
हे सगळंच विरळ होत चाललंय ...

एकमेकांना टाळ्या देत हास्याची कारंजी उडणं लुप्त होतंय...

खरं बघितलं तर किती दिवस आपण जगणार .... 
याची काहीच शाश्वती नाही....... 
सोबतीला काय घेऊन जाणार हेही माहीत नाही....

जिव्हाळ्याची अगदी कमी माणसं असतात .... 
जी आपली काळजी करतात......... 
जीव ओतून आपल्याला घडवतात.. 
वेळप्रसंगी आपल्या भल्यासाठी रागावतात ..
पण परत माया करतात..
त्यांचा विसर कधीच पडू देऊ नये..

कोणाला व्यक्त होता येतं तर कोणाला नाही.. 
हा समजूतदारपणा अंगी यायला हवा..

जगण्यासाठी दिवस फार कमी आहेत.. 
तक्रारी मात्र त्यानंतर ही सुरूच असणार..

दुसऱ्याला दुःखी करून ....... 
आपण सुखी व्हावं ही भावना किती बोचरी आहे...

आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही... 

मिळेल ते अनुभव ..
मिळेल ती उपेक्षा ..
मिळेल ते प्रेम... आदर.. 
मिळेल ती अनुभूती घ्यावी... 

प्रवाहात मुक्त जगावं.. 
जीवनात सगळेच रंग हवेत... 
निराशेतही आशा आहेच की... 
त्या ऊर्जेची वाट बघायची..

कोणा वाचून कोणाचं अडत नसतंच खरं तर..
पण ....... 
आनंद मात्र घेता येत नाही तो आपल्या माणसांशीवाय...

कौतुक करणारं..
पाठीवर हात ठेवणार कुणीतरी हवंच ना....

आपल्या दुःखाच्या प्रसंगी डोळ्यात अश्रू येणारी... 
आपलं यश डोळे भरून बघणारी ....... 
माणसं ही हवीतच अवतीभवती... 

नाहीतर यश .. पैसा खूप मिळवला ....
पण ........... 
माणसंच नसतील प्रेम करणारी 
तर त्या सारखा दरिद्री तोच...खरं ना..??....

Wednesday, November 3, 2021

From a small village in Andhra Pradesh to founding a $17 billion pharma company

From a small village in Andhra Pradesh to founding a $17 billion pharma company

A Mega-Thread on the story of an Indian billionaire scientist: Murali Devi of DivisLabs

1) Murali Divi belongs from Machilipatnam, a small town in Andhra Pradesh.
2) He comes from a very humble family background. His father ran the family of 14 on a narrow allowance of just ₹10,000 per month.
3) After completing his doctorate in pharmaceutical sciences from Andhra's Kakatiya University, he spent a few years in the US. 
4) Divi failed his intermediate exams (the equivalent of higher secondary) twice due to weak English.
5) However, instead of giving up, Divi doubled down and grabbed the opportunity to go to the US as a pharmacist instead of becoming a chemist like his elder brothers.
6) When Divi left India for the states in 1976, he was 25 years old with just $7 in his hands.
7) From there, he went on to draw a salary of $65,000 a year at US companies like Trinity Chemical and Fike Chemical.
8) He would soon come back to India with his wife and children with $40,000 and no plans.
9) In 1984 he teamed up with Kallam Anji Reddy to build Cheminor, which later in the year 2000 got merged with Dr. Reddy’s Laboratories.
10)To turn it around, Reddy and Murali Divi took over Cheminor, an ailing contract manufacturing company.
11)The idea was generated for Cheminor to be the contract manufacturing arm of Dr. Reddy, while Dr. Reddy’s concentrated on generics and drug discovery.
12)But reviving Cheminor was an improbable order. The company possessed only a few chemical reactors.
13)The equipment present was used to produce APIs, which were churning outdated products.
14)Divi took charge and stepped in as a managing director, hired a fresh crew of graduates, and trained them in the chemistry skills required to revive the firm.
15)His team included chemists who worked on developing a cost-effective manufacturing process for the API, ibuprofen.
16)A year later, the team had set up a production line which was soon scaled up to 1,200 metric tonnes catering to 25 % of the global demand for the compound.
17) On an ordinary day, Murali Divi would show up at 7:30 in the morning at his office in Hyderabad, work continuously till lunch, and then spend the entire day at the manufacturing plant to monitor the production line.
18)He would sometimes remain at the plant till midnight, ironing out kinks in the production process and hand holding his employees through any problems.
19)When he resigned Cheminor in 1990, almost 125 people resigned the same day. That tells you how well he handled people.
20)Six years later, Divi founded Divi’s Laboratories, his own pharma company. Headquartered in Hyderabad, the company makes active pharmaceutical ingredients (API) and intermediates as APIs are the critical inputs for making a drug.
21)The initial plan was to focus on customizing and manufacturing small quantities of a drug for clinical trials and laboratory experiments by big pharma companies. But international pharma giants were suspicious of outsourcing to India.
22)Naproxen is an ingredient that is popularly known as an anti-inflammatory drug. It was a crowded market, and Divis was the 22nd firm to enter it behind giants such as Swiss health care company Roche and chemical and biotech firm Lonza Group.
23)But Murali Divi had made some headway in developing an efficient process to manufacture the compound and saw an opportunity there.
24)This was a time when the industry still depended on traditional chemistry methods to produce drugs.
25) These methods were simple but inefficient because they used chemicals as catalysts, increasing costs and leading to pollution.
26) He turned to newer technologies that used enzymes instead of chemicals as catalysts and devised an efficient production process for Naproxen.
27)Today, Divis Laboratories is one of the world’s largest manufacturers of Naproxen. 
28)Over time they have snatched market share to manufacture APIs such as Dextromethorphan (cough suppressant) from Lonza, pharmaceutical arm of Dutch material and life science company DSM.
29)Since the pandemic, Murali Divi has seen his wealth more than twofold to ~ $10 billion now.
30)One of the secrets of Divi’s rise to be the second-biggest drug maker in the country is its ability to scale up capacity and cut costs using advanced technology.
31)Divi’s Labs has a strong relationship with big pharma companies, including six out of the top ten innovators, Merck, Pfizer, and GlaxoSmithKline.
32)From nowhere in 1990, Divi’s Labs is now one of the top three API manufacturers in the world.


Friday, September 10, 2021

गणेशपूजनातील २१ पत्री

*गणेश पूजनादरम्यान ची २१ पत्री (वनस्पती)*

 गणेश पूजनादरम्यान २१ प्रकारच्या पत्री वाहतात. 
या प्रथेमागे पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे मानवाच्या सभोवताली असणार्‍या निसर्गामधील अनमोल औषधी-खजिन्याचे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शास्त्रीय हेतू डोळ्यांसमोर ठेवूनच गणेशचतुर्थीसारख्या सर्वप्रिय सणावेळी पत्री वाहण्याची प्रथा पूर्वजांनी सुरू केली आहे. हजारो वर्षांच्या निरीक्षण व संशोधनानंतर मिळालेले औषधी-ज्ञान वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी पुढील पिढ्यांनाही विनासायास मिळावे हा महत्त्वाचा हेतू या पत्री वाहाण्यामागे आहे, हे उघड आहे.

*गणेशपूजनातील २१ पत्री*

🌿 *१. #अगस्ती (हादगा)*
अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने (Sesbania Grandiflors). प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व 'अ' हे दृष्टीला पोषक असतेत्या जीवनसत्त्वाचे वनस्पतिज रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये ४५००० यूजी- एवढय़ा प्रचंड प्रमाणात, म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते.

🌿 *२. #अर्जुन*
अर्जुनपत्रे (Terminallia Arjuna). अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. 'अर्जुनारिष्ट' हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच. अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणार्‍या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात, अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.

🌿 *३. #आघाडा*
अपामार्ग म्हणजे आघाडा (Achyranthus Aspera). आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी-स्त्रीरोगांवर, विशेष उपयुक्त असे आहेत.

🌿 *४. #कण्हेर*
करवीर म्हणजे कण्हेर (Nerium Odorum). हिचा उपयोग तारतम्याने करतात, कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय व श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होते.

🌿 *५. #केवडा*
केवड्याची पाने. (PendenusTectoritus). केवड्याच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेले तूप सेवन केल्यास ते मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरारोगांमध्ये केवड्याचा लेप लावला जातो.

🌿 *६. #जातिपत्र*
जातिपत्रे अर्थात जाईची पाने (Jasminum Oriculatum). जाई व्रणरोपक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढ्याने धुऊन, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.

🌿 *७. #दाडिमपत्रे*
 अर्थात डाळिंबाची पाने (Punica Granatum). चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंब आतड्याच्या रोगांवरचे गुणकारी औषध आहे. मुळाची साल ही कृमिघ्न आहे; विशेषत टेपवर्मचा (चपटय़ा कृमीं) त्रास याने नाहीसा होतो. उपलब्ध औषधे: दाडिमावलेह, दाडिमाष्टक चूर्ण. लहान मुलांना होणार्‍या जंत, जुलाब यांसारख्या आजारांमधील डाळिंबाची उपयुक्तता सर्वमान्य आहे.

🌿 *८. #बृहतीपत्रे*
बृहतीपत्रे म्हणजे डोरलीची पाने (Solanum Indicum). डोरलीसारखे रूप असणार्‍या रिंगणीच्या फळांचा व बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात किडण्याची प्रक्रिया थांबते.

🌿 *९. #तुळसीपत्र*
तुळशीची पाने (Ocimum Sanctum), तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी, इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.

🌿 *१०. #दूर्वांकुर*
दूर्वा (Cynodon Dectylon). गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.

🌿 *११. #देवदार*
चरकसंहितेमधील अनेक रोगांवरील औषधी-प्रयोगांमध्ये देवदाराचा (Pinus Deodora) समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असेसुद्धा म्हटले जाते.

🌿 *१२. #धत्तुरपत्र*
धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने (Datura Stramonium) हे श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो; अन्यथा घातक होऊ शकतो.

🌿 *१३.  #अश्वत्थपत्रे पिंपळपान*
अश्वत्थ पत्रे अर्थात पिंपळाची पाने (Phycus Religiosa). पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे; ज्याचे संदर्भ आयुर्वेदच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या पिंपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे.

🌿 *१४. #बेलपत्र*
बेलाची पाने (Aegle Marmelos. बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे : बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा, इत्यादी.

🌿 *१५. #बदरीपत्र*
बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने (Zizyphus Vulgaris). बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खा-खा होण्याचा आजार कमी होतो. बोराच्या पानांची चटणी तांदुळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.

🌿 *१६. #मरुपत्र*
मरुपत्र म्हणजे मरव्याची पाने (Origanum Margorana). मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणार्‍या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणार्‍या पियूषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही, असे आयुर्वेद म्हणतो.

🌿 *१७. #मधुमालती*
मधुमालती म्हणजे मालती (शास्त्रीय नाव - Jasminum Grandiflorum). ही पत्री प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.

🌿 *१८. #भृंगराजपत्री*
भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने (Eclipta Alba) माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे 'केश्य गुणधर्म'. केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो.

🌿 *१९. #अर्कपत्रे*
अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने. (Calotropis procera.) रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे.

🌿 *२०. #विष्णुक्रान्ता*
विष्णुक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी (Evolvulus Alsinoides). बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी, बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न दूर करते.

🌿 *२१. #शमीपत्र*
शमीची पाने (Prosopis Spicigera). शमी हा शब्द 'शमयति रोगान् इति' म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी , म्हणुन नाव पडलं शमी.

संकलित #

Saturday, July 31, 2021

बिल गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम)

बिल गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम) सांगितल्या ज्या कोणत्याही शाळेत शिकविल्या जात नाहीत. 

नियम १ - आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.

नियम २ - जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

नियम ३ - कॉलेजमधून बाहेर पडल्या-पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी व्हाईस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात.

नियम ४ - आज कदाचित तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भीतीदायक वाटत असतील, कारण अजून बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.

नियम ५ - तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चूक आहे आणि तुमचा पराजय ह सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासून धडा घ्या आणि पुढे चालत रहा.

नियम ६ - तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.

नियम ७ - उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळतो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होईपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पद्धत मात्र वेगळीच असते. खऱ्या जगात हरणाऱ्याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.

नियम ८ - आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.

नियम ९ - टीव्हीवरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्हीवरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो, असते ते फक्त काम आणि काम.

नियम १० - सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येईल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल 

नियम ११ - आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.

Friday, July 9, 2021

अशी कशी ग घुमी तु!!

प्रत्येक विवाहित पुरुषाने आवर्जून वाचावं, ही विनंती. . .
👇

*#अशी_कशी_ग_तू_घुमी* 

सीमा ला जाऊन महिना झाला होता. पंधरा दिवस थांबलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली होती. मुलगा US ला आणि मुलगी कोलकोत्याला जॉब करीत होते. तेही निघाले.

 मुलगी म्हणाली, "चला ना बाबा सोबत काही दिवसासाठी".

 मात्र सुधीर नी नकार दिला... 

रात्री त्याला भयंकर शांत वाटू लागलं...

पस्तीस वर्षाच्या सहजीवनात असं कधीच एकटं राहण्याचा प्रसंग आला नव्हता. त्याला सीमा सोबत घालवलेले दिवस आठवू लागले. कधी भांडण, तंटा झालेला सुद्धा आठवत नव्हतं. आपण कितीही आदळ आपट केली तरी ती मात्र शांतच राहायची. लोकांच्या दृष्टीने एक आदर्श जोडी. सीमा होतीच तशी. सगळयांशी मिळून मिसळून राहणारी. सुधीर नी कधी विचारही केला नाही ती अशी आपल्याला अर्ध्यावर सोडून जाईल... 

"सीमा तुझ्याशिवाय जीवन ही कल्पनाच करत नाही ग. कस जगू मी सीमा "सुधीरला हुंदका अनावर झाला... 

सीमा चे लग्न झाले तेव्हा ती वीस वर्षाची. लग्नानंतर प्रायमरी शिक्षिकेची नोकरी लागली. नोकरी, घर सांभाळत नेटाने संसार केला. मुलं चांगली शिकली. चांगल्या पदावर नोकरीला लागली. मुलामुलींचं लग्न झालं. आताच कुठे सीमा सेवानिवृत्त झाली होती. किती ठरविले होते आपण की निवृत्त झाल्यावर दोघंही मस्त फिरू.  सगळं छान असताना अशी अचानक निघून गेली. अचानक हार्ट फेल झाले. ... लक्षातच आलं नाही. अगदी शेवटच्या क्षणी लक्षत आलं. वेळच मिळाला नाही ट्रीटमेंट घ्यायला आणि  अचानक निघून गेली... 

सुधीर नी डोळे पुसले आणि कपडे बदलायचे म्हणुन कपाट उघडलं त्याला हवा तो शर्ट दिसत नव्हता म्हणुन वरच्या कप्प्यात हात घातला.. एक डायरी खाली पडली

थरथरत्या हातानी डायरी उघडली.... 

त्यानी डायरी वाचायला सुरवात केली.. 

दि, =====

नुकतंच लग्न होऊन महिना झालाय. घरचं वातावरण फार विचित्र आहे.सासू सासरे सतत भांडत असतात आणि भावाभावात पण विशेष पटत नाही.  नवरा तसा चांगला परंतु मी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणणारा. एक दोनदा काही बोलून पाहिलं पण तो आपलं ऐकणारा नाही हे कळलं त्यामुळे तुम्ही म्हणाल तस असं म्हणुन जगायचं ठरविले.. 
 बरंच काही लिहिलं होत.. तो पान  पलटवत होता...

दि...... 

आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. ह्यांना म्हटलं ,"आपण बाहेर जाऊ. सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेऊ या ".
तर म्हणाले, "मला नाही आवडत. तुला खायचं असेल तर  चाल... तू खा मी तुला सोडतो हॉटेलला".

अरे, हे काय बोलणं झालं... मला काय खायला जायची हौस होती.... 

मैत्रिणी सांगायच्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही बाहेर फिरायला गेलो... नवऱ्याने गिफ्ट दिलं ... फार हेवा वाटायचा... कारण इथे काहीच आवडत नव्हतं .. काही म्हटलं तर चिडचिड आणि भांडण.... 

त्यानंतर मी बाहेर चला म्हणणेच सोडले...... 

दि....
 माझा मुलगा पाच वर्षाचा आहे. माझ्याकडे आई आलेली.. आमच्या गप्पा गोष्टी सुरु होत्या. मुलानी खाताना इकडे तिकडे सांडवलेलं. हे बाहेरून आले. कचरा पाहून डोकं फिरलं. बडबड सुरु झाली. मी म्हटलं करते ना साफ. थांबा थोडा वेळ. माहिती नाही काय इगो दुखावला. अगदी अंगावर धावून आलेत, हात उचलला. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले. मलाही खुप अपमानित वाटले, खुप राग आला. असं वाटल सोडून जावं परंतु तेवढी हिम्मत नव्हती आणि त्यांचा राग उतरला की परत चांगले वागतात. आपण काही चुकीचं वागल.. हीच मन दुखावलं हे ज्ञानीही नसत... मी मात्र विसरू शकत नाही.. सगळं दुःख. मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवते... आणि परत कधी ठेचं लागली तर कप्पा उघडून बघते... फार त्रास होतो तेव्हा.. 

दि,.... 

आज मी पडद्याचे कापडं आणले... खुप ओरडले.. 

कुठलीही गोष्ट ह्यांच्याच मनाप्रमाणे व्हावी. मला घर सजवायला खुप आवडायचं.. काही विकत घेऊ या म्हटलं तर त्यावर लेक्चर देणार.. तुला वापरायची तरी अक्कल आहे का   वगैरे वगैरे... काही कधी विकत आणले तर त्यात खोट काढणार. तुझी पसंद चांगली नाही... तुला व्यवहार समजत नाही.. तुला लोक ठगवतात... इतक बोलणं होतं की वाटतं कशाला आणलं आपण विकत... त्यानंतर मात्र काहीही विकत आणले नाही.... 

पानांमागून पान पलटवू लागला.. प्रत्येक पानावर त्याच्या तक्रारीच लिहिल्या होत्या. रमेश ला खुप आश्चर्य वाटले की आपल्याला कधी वाटलेच नाही की सीमा इतकी दुःखी आहे. सीमाच्या मनात इतकी कटुता असून ती वरून चांगलीच वागायची. आणखी एक पान पलटवले.... बहुतेक शेवटचे 

दि.... 
आज खुप डावा हात दुखतोय. यांना सांगून काय उपयोग. दवाखान्यात चला म्हटलं तर बडबड करणार त्यापेक्षा नकोच मीच जाऊन येते.... तसंही ह्यांना बाहेरगावी जायचं आहे.

दि.... 

काल मैत्रिणीसोबत दवाखान्यात जाऊन आली... डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या.. Ecg मध्ये प्रॉब्लेम निघाला.. त्यानंतर अँजिओग्राफी सांगितली...

यांना फोन लावला... म्हणाले ज्या काही तपासण्या करायच्या त्या करून घे... 

 अँजिओग्राफी केली....95 टक्के ब्लॉकेज... डॉक्टरांनी सांगितले ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल... 

घरी येऊन यांना सांगावं या विचारातच घरी आले.....हे बाहेरगावावरून आलेले होते. 

घरी येताना औषध आणायला विसरले.... खुप थकवा आला होता... 

म्हटलं, थोडी औषधं आणून देता का? 

'आताच आली ना रस्त्याने, आणायची ना स्वतः,परत कपडे बदलवू, परत जाऊ "
.
"खुप चिडचिड आणि बडबड केली "

"असू द्या, मी घेईल उद्या "

"अग, पण काय झालंय.... काय सांगितलं डॉक्टरांनी "

"काही नाही, सगळं ठीक आहे "

मी ह्यांना काहीही सांगितलं नाही... साधी औषध आणायला सांगितली तर किती त्रास ? आणि आपलं ऑपरेशन असलं तर किती त्रास करून घेतील.. तसंही आपण जगून काय करायचं.. मुलगा, मुलगी सेटल आहे... रोजची लहान सहान बाबीवरून कटकट... आता मी थकली... हार्ट प्रॉब्लेम म्हणजे मरताना त्रासही होणार नाही.. शांतपणे जाता येईल.. घेतच नाही आता औषध आणि जातच नाही आता दवाखान्यात........ 

डायरीचे शेवटचेच पान होते. 

सुधीर नी डायरी बंद केली.. डोळ्यातून अश्रू वाहू लागले... सीमा चा हार्ट अटॅक नसून आत्महत्या आहे आणि त्याला कारणीभूत मी आहे....

सीमा, माझं वागणं तुला पटत नव्हतं तर तेव्हाच विरोध करायचा ना... तुझ्या मनात एवढा असंतोष होता हे कधी मला कळलंच नाही.. मला वाटायचं आपण एकरूप आहोत परंतु नाही, तुझं शरीर फक्त माझ्या सोबत होत आणि तुझं मन?? ते तर कधी माझं झालंच नाही..... 

का वागली तू अशी सीमा ? कोणत्या गुन्ह्यांची शिक्षा दिलीस तू? सीमा मी तुला समजूच शकलो नाही... आणि तू मला समजून घेतलं नाही.... 

मी तू आणि मी वेगळे आहोत असं कधी विचारच केला नाही... मला वाटायचं मी माझा निर्णय तुला सांगतो आणि तो तुला पटतोय.. तुझ्यावर लादतोय असं कधी मला वाटतच नाही... तुझं मन मला कधी वाचताच आलं नाही.... पण सीमा, अग एकदा बोलायचं होत ग.. व्यक्त व्हायच होत... भांडलो असतो कदाचित... परंतु कदाचित मला तुझं म्हणणं पटलं ही असत... नसत पटलं तर निदान मला अपराधी पणाची भावना घेऊन तर जगावं नसत लागलं.... सीमा, *अशी कशी ग घुमी तु!!*

🍁🍂🍁🍂🍁🍂

CP

Tuesday, June 22, 2021

*🌹पिशवीभर आनंद!*🌹

*🌹पिशवीभर आनंद!*🌹 

शुक्रवारी संध्याकाळी शहराच्या साधारण मध्यभागी असलेल्या एका माॅलमध्ये एक प्रौढ दांपत्य खरेदीला आले होते. 
खरं तर आता दोघेच असतात घरी, 
फारशा वस्तू लागत नाहीत पण थोडा वेळ जाईल, कंटाळवाण्या रूटिनमध्ये थोडा बदल होईल म्हणून त्यांनी शुक्रवारचा दिवस निवडला होता. 
शनिवार रविवारच्या गर्दीत त्यांना अस्वस्थ वाटायचे.  
सवयीने एक ट्राॅली घेऊन त्यांनी रॅकवर असलेल्या वस्तूंवर नजर टाकायला सुरुवात केली. 
त्याचवेळी,  त्यांचे लक्ष आजूबाजूच्या खरेदीकरता आलेल्या लोकांवर होते. 
त्यांचे लक्ष वेधून घेतले ते त्यांच्यापेक्षा लहान दांपत्याने. 
ते दोघे खरेदीत मश्गुल झाले होते.  
आवडलेली एखादी वस्तू शेल्फमधून काढून त्याची किंमत, माहिती वाचून ते बहुधा वस्तू घ्यायची की नाही हे ठरवत होते.  
एखादी गोष्ट बजेटच्या बाहेर आहे असे जाणवले की किंचीत नाराज होऊन ती वस्तू परत नीट जागेवर ठेवत होते. 
ज्येष्ठ दोघांनी हे सगळं टिपले आणि आपसात एकमेकाकडे बघून हसले  ज्येष्ठ दांपत्याला आपले नवशिकेपणाचे दिवस आठवले. 
एकेक रूपया खर्च करताना विचारपूर्वकच ठरवावे लागायचे असे ते दिवस होते.
काय वाटले कोणास ठाऊक, ते दोघे त्या वयाने लहान नवरा बायकोकडे चालत गेले. 
"नमस्कार,  आपण ओळखत नाही एकमेकांना. माझ्याकडे या माॅलचे दोन हजार रुपयांचे एक फ्री कुपन आहे. 
त्याची मुदत चार दिवसात संपणार आहे, आम्हाला काही खरेदी करायची नाही तर तुम्हाला ते कुपन दिले तर चालेल का? " 
समोरून सहाजिकच प्रश्न आला, 
"त्या बदल्यात आम्हाला किती पैसे भरावे लागतील?" 
"दोन हजारापर्यंत काहीच नाही, 
त्याहून जास्त खरेदी झाली तर मात्र वरचे पैसे भरावे लागतील. 
"ज्येष्ठ जोडप्यातल्या नव-याने  शंका समाधान केले. 
तरूण दांपत्याला आश्चर्य वाटले. त्यातली बायको म्हणाली ," 
आम्हालाच का देताय हे तुमचे कुपन? " 
"मला वाटलंच तुम्हाला हा प्रश्न पडणार.. 
कारण  मगासपासून आम्ही तुम्हाला बघतोय, आमचे सुरूवातीचे दिवस आठवले आम्ही पण असेच टॅग बघून खरेदी केली अनेक वर्षे! 
हे पहा, तुम्हाला फसवायचा, त्रास देण्याचा हेतू नाही पण वापरले नाही तर हे कुपन अगदी वाया जाईल म्हणून देतोय तुम्हाला. 
या बदल्यात  तुमची खरेदी झाली की आपण शेजारी आईसक्रीम शाॅप आहे तिथे भेटू, चालेल?" 
ज्येष्ठ स्त्रीने तोडगा काढला. 
तरूण जोडप्याने एकमेकांकडे पाहिले आणि ते कुपन घेऊन ते खरेदीकरता वळले ज्येष्ठ जोडपे कॅश काऊंटरच्या दिशेने निघाले. 
तरूण जोडप्याची चर्चा सुरू झाली, काय घ्यावे? 
त्यांना गॅसची शेगडी घ्यायची होती घरची जरा बिघडलीच होती. 
ती दोन हजारात नसती आली, मग कपडे वाळत टाकायचा स्टँड तो ही महाग होता. 
बराच काथ्याकूट झाल्यावर नवरा म्हणाला, "सरळ वाण सामान घेऊन जाऊ.."
त्याचे म्हणणे खोडत बायको म्हणाली, "तेवढं आपण दोघे आरामात कमावतो, आता अशा गोष्टी घेऊ ज्या सहसा आपण घेणार नाही." 
नव-याला लगेच पटली ही कल्पना. 
दोघांनी पटपट यादी करायला सुरूवात केली. 
मुलांसाठी मोठ्या रंगपेट्या, शाळेचे लेखन साहित्य,  चाॅकलेट, सुकामेवा, मुलांच्या आवडीचा खाऊ, स्वयंपाकघरात लागणारे लाकडी उलथन, डाव, मसाले असे बरेच काही घेताना ते सतत बेरजा करत होते. 
दोघांना मजा आली खरेदी करताना.  
कॅश काऊंटरवर वस्तू मोजून घेताना त्यांच्या लक्षात आले एक मोठी पिशवी छोट्या छोट्या वस्तूनी भरून गेली होती. 
दोघं आनंदी चेह-याने बाहेर आले. 
समोर ते दांपत्य होतेच. 
चौघे आईसक्रीम शाॅपमध्ये बसले. ऑर्डर दिली. आईसक्रीम खाताखाता ज्येष्ठ दांपत्यातला नवरा म्हणाला," पोरांनो,  ऐकाल माझे?" 
दोघे कान टवकारून ऐकू लागले. 
"आज तुम्हाला अचानक खरेदीचा योग आला. 
जर महाग गोष्ट घेतली असतीत तर एकच आली असती, पण बघा आज तुमच्या पिशवीत लहानलहान गोष्टी आहेत त्या तुम्हाला थोड्या काळासाठी का होईना खूप आनंद देणार आहेत..
आणि *जन्मभराच्या आठवणीदेखील. आपले आयुष्य असंच आहे एक महागाची मोठी गोष्ट परवडत नाही म्हणून खट्टू होऊन जगण्यापेक्षा पिशवीभर छोटे आनंद जगायला काय हरकत आहे*? 

*मोठी ध्येय असावीत पण त्यामागे धावताना रोजचे छोटे आनंद तेवढे निसटू देऊ नका*.. 
साॅरी बरं का, एकदम प्रवचनच दिले मी तुम्हाला" असे म्हणत दोघे उठले आणि गेटकडे निघालेदेखील. 
तरूण जोडप्याला "धन्यवाद" म्हणायचा वेळही न देता. 
ते दोघे भानावर आले तेव्हा त्यांना जाणवले ," अरे ते दोघे उतरले बघ.." 
बायको म्हणाली पण तोवर ते दोघे ज्येष्ठ खाली उतरले पण होते.." उतरले ग ते ! साध थँक्यू पण म्हटले नाही आपण..." नवरा म्हणाला. 
"आपली परिस्थिती सुधारली ना की *असाच पिशवीभर आनंद देऊ कोणा अपरिचिताला*..आपोआप थँक्यू पोचतील त्यांना,  काळजी नको करू." बायकोने नव-याला आश्वस्त केले. 
त्यांना जाणवले खूप मोठा धडा शिकलोय आपण. 
तो 'पिशवीभर आनंद'  घेऊन आपल्या घराकडे ते आनंदाने निघाले..

✍️अनघा किल्लेदार
पुणे.

प्रारब्ध आणि संगत...

प्रारब्ध आणि संगत..

एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, " अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तर उदया तू माझ्या घरी जेवायला ये."
भुंगा दुस-या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उदया माझ्याकडे ये!..

दुस-याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं.
किड्याने परागरस चाखला.किती भाग्यवान मी!...अस म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या श्रीकृष्णाच्या चरणांवर अर्पण केलं. किड्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं. संध्याकाळी पुजा-याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली. आता किडा स्वतःच्या नशीबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला,
"भाऊ, काय चालू आहे मनात?.."
किडा म्हणाला, "बंधू , जन्मोजन्मीच्या पापांची मुक्ती झाली. प्रारब्धातून सुटलो एकदाचा!..हे सर्व चांगल्या संगतीचं फळ आहे.

सांगायच तात्पर्य हेच की कोणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही म्हणून निसर्गनियमाने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी.
 नात्यांमध्ये आस्था असावी पण आसक्ती नाही कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं. आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू द्यावं मग आसक्ती निर्माण होत नाही.
मूळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो आणि 'ते उकलण्याचा एकमेव मार्ग ध्यानसाधना.' 

प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेण असेल किंवा आपण कोणाचं देण लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीच प्रयोजन कळतं म्हणून फक्त आपण कर्म करत राहावं इतकंच!...

Saturday, May 15, 2021

गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेले १० पापकर्म

*गरुड पुराणामध्ये असे १० काम सांगण्यात आले आहेत, जे पाप मानले जातात.* 

*१)पहिले पाप*
सामान्यतः स्त्रीचा अपमान कधीच करू नये, परंतु गरोदर किंवा मासिक धर्म दरम्यान स्त्रीला वाईट बोलणे महापाप आहे. अशा व्यक्तीला महादेव आणि देवता माफ करत नाहीत.

*२)दुसरे पाप*
इतरांचे धन प्राप्त करण्याची इच्छा ठेवणे, हेसुद्धा शास्त्रानुसार पाप आहे.

*३)तिसरे पाप*
एखाद्या सध्या-सरळ व्यक्तीला किंवा जीवाला कष्ट देणे, नुकसान पोहोचवणे त्यांच्यासाठी बाधा निर्माण करणे हेसुद्धा महापाप आहे.

*४)चौथे पाप*
चांगले-वाईट, चूक-बरोबर जाणून घेतल्यानंतरही चुकीचे काम करणे महापाप आहे.

*५)पाचवे पाप*
इतरांच्या पती किंवा पत्नीवर वाईट नजर ठेवणे किंवा त्यांना मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हेसुद्धा महापाप आहे.

*६)सहावे पाप*
इतरांचा मान-सन्मान कमी करण्याच्या इच्छेने खोटे बोलणे, छळ-कपट करणे, षडयंत्र रचणे महापाप आहे

*७)सातवे पाप*
लहान मुलं, महिला किंवा कोणत्याही कमजोर व्यक्तीची हिंसा करणे, असामाजिक कर्म करणे महापाप आहे.

*८)आठवे पाप*
एखाद्या मंदिरातील वस्तू चोरणे किंवा चुकीच्या पद्धतीने इतरांची संपत्ती हडपणे महापाप आहे.

*९)नववे पाप*
गुरु, आई-वडील, पत्नी किंवा पूर्वजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला महादेव कधीही माफ करत नाहीत.

*१०)दहावे पाप*
नशा करणे, दान केलेल्या वस्तू किंवा धन परत घेणे महापाप आहे. कोणत्याही अधार्मिक कामामध्ये सहभागी होणे महापाप आहे.

Friday, February 12, 2021

झोप . !.....

*झोप . !.....*
 
*अतिशय गरजेची वाचा*

शास्त्रज्ञांनी अशी एक उपाययोजना शोधली आहे की जी तुम्हाला दीर्घायुषी बनवते, तुमची स्मृती, सर्जनशीलता वाढवते, तुम्ही बारीक राहता, जास्त लक्षवेधक दिसू |लागता. ही उपाययोजना तुम्हाला सर्दी, फ्लूपासूनच नाही तर कर्करोग आणि स्मृतीभ्रंशापासून देखील वाचवू शकते. हृदयविकार, पक्षाघात, मधुमेह होण्याचा धोका कमी करते आणि तुम्हाला जास्त आनंदी आणि तणावमुक्त ठेवते..

काहींना हे वर्णन अतिरंजित वाटेल, पण यातला प्रत्येक शब्द शास्त्रीय चाचणीवर खरा उतरलेला आहे. ही बातमी ना रंजक द्रव्याची आहे ना कुठल्या जादूई औषधाची! ही आहे आठ तासांच्या शांत झोपेमुळे मिळणाऱ्या फायद्याची! आपण मात्र आज या आठ तास झोपेला फारसे महत्त्व देत नाही, ती नियमित घेत नाही आणि खरं सांगायचं तर कित्येकांना ‘ती’ येतही नाही. ती म्हणजे, झोप!

झोप म्हणजे फक्त जागेपणाचा अभाव असा अर्थ होत नाही. ती एक खूप गुंतागुंतीची, चयापचय असलेली प्रक्रिया आहे. झोप सर्वानाच जरुरी आहे. आपल्या मेंदूत एक घडय़ाळ असतं, जे अंधार, प्रकाश किंवा तापमानातील बदल यावर चालतं. ‘सरकाडियन ऱ्हिदम’ (circadian rhythm) म्हणतात याला. हे घडय़ाळ वसलेले असते ‘सुप्राकयाझमॅटिक नुक्लियस’ नावाच्या मेंदूच्या छोटय़ाशा भागात. सुप्रा म्हणजे वर आणि कयाझमा म्हणजे क्रॉसिंग. हा भाग डोळ्यातून संवेदना घेऊन येणाऱ्या दोन नसांच्या क्रॉसिंगच्या वर असल्यामुळे डोळ्यांतून आलेल्या प्रकाश संवेदना त्याला लगेच कळतात. संध्याकाळ झाली की हे घडय़ाळ मेलॅटोनीन नावाचा एक दूत मेंदूकडे पाठवते. तो इशारा देतो की, ‘अंधार होतोय, झोपेची वेळ झाली’.

प्रत्यक्ष झोप अडिनोसिन नावाचे रसायन आणते. जशी याची मात्रा वाढते मेंदूत एक प्रकारचा झोपेचा दबाव निर्माण होतो आणि झोप लागते. दिवस उजाडल्यावर प्रकाशाची संवेदना डोळ्यांतून मेंदूकडे जाते. मेलॅटोनिनचे स्रवणे बंद होते. मेंदूला उठण्याचा इशारा मिळतो. मेंदूतील घडय़ाळ आणि झोपेसाठीचा दबाव हे झोप लागण्यासाठीचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. झोपेला घालवण्यासाठी लोक कॉफी पितात. कॉफीत कॅफिन असते. अडिनोसिन मेंदूच्या पेशींच्या ज्या खाचांमध्ये स्वत:ला फिट करून झोपेचा दबाव निर्माण करते त्या जागा कॅफिन चक्क  अनधिकृतरित्या बळकावते. त्यामुळे अडिनोसिनने निर्मिलेला झोपेचा दबाव मेंदूला समजत नाही. आपण जागेच राहतो.

आपण झोपतो तेव्हा आपले सारे स्नायू शिथिल होतात. जलचर प्राणी असा झोपला तर त्याला जलसमाधीच मिळायची. एका वेळेस त्यांचा अर्धाच मेंदू झोपतो, बाकी अर्धा शरीराच्या गतिविधी सांभाळतो. पक्षांमध्येही सुरक्षेसाठी हे घडते. पक्षांच्या मेंदूचा जो अर्धा भाग जागा असतो त्याच्या विरुद्ध बाजूचा डोळाही उघडा असतो. म्हणजे पक्षाचा अर्धा मेंदू संकटावर चक्क ‘डोळा’ ठेवून असतो. आपले पूर्वज दोन भागांत झोपायचे. रात्रीची लांब आणि दुपारची छोटी झोप(nap) आजकाल दुपारची झोप दुर्मिळ झाली. तरीही दर दुपारी आपला जेनेटिक कोड आपल्याला या झोपेशी जोडू पाहतो. जेवणानंतर नवीन गोष्ट लक्षपूर्वक ग्रहण करायची आपली शक्ती कमी होते. जेवणानंतरच्या मीटिंगमध्ये, वर्गांत लोक पेंगतात. ग्रीसमध्ये पूर्वी दुपारी १ ते ४ सारी दुकाने बंद असायची आणि तेव्हा त्या भागातले लोक दीर्घायुषी होते म्हणे. पुण्यातल्या लोकांचे दुपारचे बंद दुकान आणि त्यांची झोप हा चेष्टेचा विषय अनेक वर्षांपासून होता, पण शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून ते बरोबरच होते.

झोपल्यावर आपला मेंदू जास्त क्रियाशील असतो. नवीन गोष्ट शिकण्यासाठी मेंदूला तयार करायला आणि शिकल्यानंतर ती गोष्ट पक्की लक्षात ठेवायला शांत झोप अत्यावश्यक आहे. दिवसभरात मिळालेली माहिती मेंदूत हिप्पोकॅम्पस नावाच्या भागात साठवली जाते. याची साठवण क्षमता यूएसबी ड्राइव्हसारखी छोटी असते. त्यात जर माहिती जातच राहिली तर नवीन गोष्टी साठवल्याच जाणार नाहीत. इथे झोप आपली अहं भूमिका पार पाडते. गाढ झोपेत मेंदूतल्या विद्युत लहरी कुरिअर सव्‍‌र्हिससारखे काम करतात. हिप्पोकॅम्पसमधल्या मेमरी फाइल्स मुबलक जागा असलेल्या कॉर्टेक्समध्ये पाठवल्या जातात. मगच त्या गोष्टी आपल्या आठवणीत पक्क्या बसतात. आपली एखादी मेमरी फाइल विस्मृतीच्या कप्प्यात गेली असेल, तर आठ तासांच्या शांत झोपेत मेंदू या फाइल्स शोधून परत आणू शकतो. शांत झोपेतून उठल्यावरचा अनुभव सांगतो, ‘‘अरे, काल मला जे आठवत नव्हतं ना ते आत्ता आठवलं पहा!’’ ही आहे झोपेची करामत.

झोप काय देते यापेक्षा ती घेतली नाही तर ती काय घेऊन जाते हे पाहणे जास्त डोळे उघडणारे ठरू शकते. अपुऱ्या झोपेचा परिणाम सगळ्यात आधी आपल्या एकाग्रतेवर होतो. तिचा पायाच डळमळतो. अशा व्यक्तीने ड्रायव्हींग केलं तर झोपेच्या दबावामुळे ती व्यक्ती मायक्रोस्लीपमध्ये जाऊ शकते. या स्थितीत काही क्षणासाठी मेंदूच्या सगळ्या संवेदना जातात. अ‍ॅक्सिलरेटर दाबायचा की ब्रेक, व्हील कुणीकडे फिरवायचं याची निर्णयक्षमता ४५ सेकंदासाठी पूर्णपणे जाते. भयानक अपघात घडतात. दारू आणि अपुरी झोप याचं एकत्र येणं तर आणखीनच भयावह. वर्तमानपत्रात रोज दिसणारे अपघातांचे फोटो पाहिल्यावर आणि ड्रायव्हरचा ताबा सुटला हे वाक्य वाचल्यावर अपुरी झोप आपल्याला मृत्यूच्या दारात नेऊन उभी करू शकते हे पुरेपूर पटतं.

अपुरी झोप आपले भावनांवरचे नियमनही घालवते. छोटय़ाशा कारणाने आपण राग, भीती, नैराश्य अशा आदिम भावनांकडे जातो. झोपेपासून वंचित असणाऱ्या माणसाच्या मेंदूत राग, भीती या भावनांच्या पायडलवर विवेकी विचारांचा ब्रेक राहत नाही, कारण मेंदूतल्या जोडण्या विस्कळीत झालेल्या असतात. कित्येक लोक आठवडय़ातले पाच दिवस चार ते पाच तासही झोपत नाहीत. आणि म्हणतात, आम्ही शनिवार, रविवारी ही उरलेली झोप भरून काढतो. पण झोपेचं बँकेसारखं नसतं. कर्ज जमा करायचं आणि मग ते भरत जायचं. दिवसभरात गोळा केलेली माहिती आठवणींच्या कप्प्यात पक्की होण्यासाठी त्या दिवशीची झोप त्याच दिवशी घ्यावी लागते. झोपेच्या योग्य काळ वेळेचे महत्त्व न समजल्यामुळे अपुरी झोप जीवन पद्धत बनली आहे. हीच आपल्याला स्मृतिभ्रंशाकडेही नेते आहे. आठ तासांच्या शांत झोपेत मेंदूत स्वच्छता मोहीम राबवली जाते. दिवसभरात तयार झालेली अमिलॉइडसारखी विषारी प्रथिने एका सिस्टीमद्वारे मेंदूतून दूर केली जातात. ही घातक प्रथिने जर नियमित झोपेद्वारे दूर केली गेली नाहीत तर त्याचे छोटे छोटे गोळे मेंदूच्या विविध भागांत साचतात. अल्झायमर होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते.

संकटाच्या क्षणी म्हणजे जेव्हा लढा अथवा पळा अशा परिस्थितीशी आपण सामना करतो तेव्हा ‘सिम्पाथेटीक नव्‍‌र्हस सिस्टीम’ उत्तेजित होते. मग हृदय जोरात पळू लागतं, जास्त रक्त जास्त जोराने शरीरात पंप होतं, रक्तदाब वाढतो. या चेतासंस्थेला परत शांत करण्याच्या कामात रोज रात्रीची शांत झोप खूप महत्त्वाची भूमिका बजावते. जर ही शांत झोप ५ ते ६ तासांपेक्षा कमी मिळाली तर ही चेतासंस्था उत्तेजित स्थितीतच राहते. हे आपल्या शरीरासाठी हानीकारक असते. शरीराला वाटत राहतं की आपण स्ट्रेसमधून जातो आहोत. मग कॉर्टीसाॅल नावाचे द्रव्य पण हिरिरीने पुढे येते. या सगळ्याचा परिणाम असा होतो की हृदयाची गती व रक्तदाब वाढलेलाच राहतो. ही स्ट्रेस हार्मोन्स रक्त  वाहिन्यांनाही हानी पोहोचवतात. साहजिकच हृदयविकार, उच्च रक्तदाब, अर्धागवायू होण्याचा धोका कैकपटीने वाढतो.

जेव्हा शांत झोप कमी होते तेव्हा वजन वाढीस लागतं. विशेषत: पोटाचा घेर. आपली भूक नियंत्रित करणारी दोन हार्मोन्स असतात. लेप्टीन, जे पोट भरल्याचे संकेत देतं. दुसरं घ्रेलिन, जे भूक लागली हे सांगतं. अपुऱ्या झोपेमुळे लेप्टीन कमी होतं आणि घ्रेलिन वाढतं. पोट भरलेलं लेप्टीन सांगत नाही आणि घ्रेलिन सांगत राहतं की, भूक शमलेली नाही. त्यामुळे कमी झोपणाऱ्या माणसाला जेवायचं समाधान मिळतच नाही. जणू अपुऱ्या झोपेचा गुन्हा करणाऱ्याला डबल शिक्षा. जे कमी झोपतात ते दुसऱ्या दिवशी उत्साही नसतात म्हणून ते व्यायाम करत नाहीत आणि खाण्यासाठी जास्त गोड पदार्थ निवडतात. सध्या दिसत असलेल्या लठ्ठपणाचे इतर कारणांसोबतच अपुरी शांत झोप हे पण एक महत्त्वाचे कारण ठरते.

आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या रक्तातली साखर वाढते. इन्सुलिन नावाचे हार्मोन लगेच शरीरातल्या पेशींना हाकारून सांगते की, ‘‘तुमच्या झडपा उघडा आणि रक्तातल्या साखरेला आत घ्या. पेशी त्याप्रमाणे ऐकतात आणि रक्तातली साखर प्रमाणात राहाते. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातल्या पेशी इन्सुलिनच्या हाकेला ओ देणं कमी करतात. मग त्यांच्या झडपा उघडत नाहीत आणि रक्तातली साखर वाढलेली राहते. म्हणजे अपुऱ्या झोपेमुळे येणारा लठ्ठपणा, कमी व्यायाम, जास्त गोड खायची इच्छा, शरीरातल्या पेशींनी इन्सुलिनचे न ऐकणे हे सारे काही आपल्याला रेड कारपेट अंथरून टाईप २ डायबेटिजपर्यंत घेऊन जाऊ शकतात.

कुठलाही जिवाणू किंवा विषाणू शरीरात दाखल झाला की त्याच्याशी लढायला शरीरात एक लढाऊ फौज ‘इम्युन सिस्टीम’ असते. साधारण सात तासांची शांत झोप या सैन्याला अधिक शक्तिशाली बनवते आणि नवीन कुमक तयार करते. कोरोना असो की स्वाइन फ्लू या साथींच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांमध्ये एक असते ‘पुरेशी झोप घ्या’. कुठल्याही आजाराशी लढायला ‘अंदरसे स्ट्राँग’ बनण्यासाठी ही सूचना फार महत्त्वाची आहे. या फौजेत एक बटालियन असते किलर सेलची. ही कर्करोगाच्या पेशी नामोहरम करून टाकते. हे किलर सेल सतत सज्ज ठेवायला आपल्याला पुरेशी झोप घ्यायलाच पाहिजे.

सध्या घराघरात दिसणाऱ्या अनेक आजारांच्या मुळाशी अपुरी झोप ही महत्त्वाची गोष्ट आहे याची आपल्याला जाणीव नाही. कारण आपण तिला महत्त्वच देत नाही. आपल्या जगण्याच्या रेटय़ात, रंगीबेरंगी स्क्रीन्सच्या वेडाच्या भरात आपण "झोप" या मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष करतो आहोत.

 आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या धकाधकीच्या जीवनातल्या कुठल्याही कामात यश हवे असेल तर एकाग्रता हवी. ती साधण्यासाठी जीवन मोजके असावे. 
म्हणजे मोजकेच शब्द बोलावे, नियमित पावलांनीं चालावे आणि महत्त्वाचे म्हणजे कोणा एका योग्य वेळी झोपेलाही मान द्यावा. यात जणू आर्जव आहे. झोप आली असता तिचा मान राखा. तिला महत्त्व द्या. आज एकविसाव्या शतकातले विज्ञानही पुन्हा हेच सांगते आहे.

मॅथ्यूवॉकर ह्या न्यूरोसायण्टिस्टचे असे मत आहे की, ‘आता अशी वेळ आलेली आहे की इतर आजारांसाठी औषधोपचार लिहिताना डॉक्टरांनी झोपेचे पण प्रिस्क्रिप्शन द्यावे. अर्थात ते झोपेच्या गोळ्यांच्या प्रकारात नसावे.’

आत्तापर्यंत उपलब्ध असलेल्या झोपेच्या गोळ्या झोप लवकर आणतात, परंतु ही झोप नैसर्गिक झोपेसारखी नसते. आपली स्मृती, एकाग्रता, कलात्मकता वाढवणारे जे नैसर्गिक झोपेचे फायदे आहेत तेही झोप पूर्णत: देऊ शकत नाही. चांगली झोप येण्यासाठी आपण खालील गोष्टी नक्कीच करू शकतो-

* झोपेच्या वेळेत फारसा बदल करू नका. कधी उठायचे यासाठी गजर लावण्याऐवजी कधी झोपायला जायचं यासाठी लावा आणि ती वेळ पाळा.

* नियमित व्यायाम करा, पण झोपेच्या आधी दोन-तीन तास नको.

* कॉफी, चहा, चॉकलेट दुपारनंतर नको.

* दारू आणि तत्सम पदार्थ टाळा.

* रात्री उशिरा खूप जड जेवण घेऊ नका.

* झोपायची खोली शांत, पुरेशी थंड आणि अंधारी असावी. बिछाना आणि उशी आरामदायी असावी. कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण तिथे नसावे.

* झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करा.

* खोलीतल्या घडय़ाळ्याचे तोंड तुमच्याकडे नसावे. झोप आली नाही तर आपण सारखे त्याकडे पाहतो आणि मग अरे बापरे इतके वाजले अजून आपल्याला झोप येत नाही, या ताणाने येणारी झोप येत नाही.

* दिवसाचा प्रकाश ही झोपेचे नियमन करणारी महत्त्वाची गोष्ट आहे. रोज अर्धा तास तरी स्वच्छ सूर्यप्रकाशात वावरा.

* रात्री आठनंतर सर्वच घरातले दिवे मंद ठेवा. सगळे स्क्रीन्स नाईट मोडवर ठेवा. टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप कोणतीही स्क्रीन नको.

* बिछान्यावर पडल्यावर झोप आली नाही तर तिची वाट पाहात पडून राहू नका, अशा वेळी मोठा दिवा लावून काही वाचूही नका. ताण घालवण्यासाठी मंद संगीत ऐकणे सगळ्यात चांगले.

या वर्षीच्या जागतिक झोप दिनाचे (१३ मार्च) ब्रीदवाक्य होते, ‘बेटर स्लीप, बेटर लाइफ, बेटर प्लॅनेट.’ जे कायमस्वरूपी आपल्याला लागू आहे.   अधिक चांगले जग हवे असेल तर सुरुवात स्वत:पासूनच करायला हवी.

गेल्या आठ दिवसांतली आपल्या झोपेची पाने जरा चाळून बघा. कशी होती माझी झोप? एकदा का त्यातल्या कमतरता उमजल्या, समजल्या, आपण त्या स्वीकारल्या तर त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करता येतील. हो अगदी आजपासूनच.

आठ तासांच्या शांत, निवांत, निरामय झोपेसाठी शुभेच्छा !

🍁🍁🍁🍁🍁🍁

- डॉ प्रकाश ढोकणे नवी मुंबई

Monday, February 8, 2021

उसना उजेड

🌴🍁🌴🍁🌴🌻🌴🍁🌴🍁🌴
              
                  *🌹उसना उजेड 🌹*

      एकदा असे घडले की, एका गृहस्थाकडं त्याचा एक आंधळा मित्र गप्पा मारायला आला होता... गप्पा इतक्या रंगल्या की, अंधार कधी पडला ते त्या सद्गृहस्थाला कळलेही नाही... मग मित्र जायला निघताच त्यानं त्याच्या हाती कंदील दिला... आणि तो मित्राला म्हणाला, "बाहेर खूप अंधार पडला आहे... त्यामुळे तू हा कंदील घेऊन जा"...
     यावर तो आंधळा मित्र  म्हणाला, "अरे बाबा, मी तर असा ठार आंधळा आहे... मला अंधार आणि उजेड सारखेच... मला या कंदिलाचा काय उपयोग"…? "हा कंदील तुझ्यासाठी नाहीच... तो डोळस माणसासाठी आहे... या उजेडामुळं कुणीही वाटसरू तुझ्या अंगावर आदळणार नाही, असे "तो सद्गृहस्थ म्हणाला... हे मात्र त्याच्या आंधळ्या मित्राला पटलं... तो कंदील घेऊन चालू लागला...
     मात्र थोड्याच वेळात एक माणूस त्याच्या अंगावर आदळला... संतापानं आणि आश्चर्यानं आंधळा मनुष्य ओरडला... "अरे, अरे, काय चाललंय तुझं?... माझ्या हातातला हा पेटता कंदील तुला दिसत नाही का"?... त्यावर जास्तच आश्चर्यानं तो वाटसरू म्हणाला", अरे भाऊ, तुझा कंदील कधीच विझून गेलाय... हे तुझ्या लक्षात नाही का आलं"?...
     हे ऐकताच आंधळा मोठ्यानं हसला आणि म्हणाला, "नाही लक्षात आलं, पण मला आज एक गोष्ट मात्र कळली... "उसना घेतलेला उजेड फार काळ आपल्या उपयोगी पडत नाही"...
    म्हणून "अत् दिप भव", म्हणजेच "स्वयं-प्रकाशित व्हा"...

प्रयत्ने_वाळूचे_कण_रगडीता

#प्रयत्ने_वाळूचे_कण_रगडीता 

एक साधारण पंचाहत्तर ऐंशी वर्षे वयाचे आजोबा पहाटेचा गजर ऐकून उठतात. एकटेच राहत असतात. घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात ठेवलेलं जडच्या जड डंबेल दोन्ही हातांनी उचलायचा प्रयत्न करतात, पण छे! अवघड असतं त्यांच्यासाठी ते. 

दुसऱ्या दिवशी पण अगदी हाच कार्यक्रम! रोज त्यांचे प्रयत्न सुरूच असतात. एके सकाळी कसंतरी ते डंबेल आजोबा दोन्ही हातांनी ओढत घराबाहेरील बागेत घेऊन येतात. एवढं केल्यानेही ते थकून तिथेच बसतात. 

मग दुसऱ्या दिवशीपासून रोजच पहाटे बागेतच ते उचलायचा प्रयत्न! आजुबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी चर्चेचा आणि आश्चर्याचा विषय होतो हा! बाजूलाच राहणारी म्हातारी खोचकपणे बघत असते. 

रोज लोक त्यांना बघत असतात. कोणी हसतं, कोणाला त्यांची काळजी वाटते तर कोणाला अजुन काही. पण आजोबा सगळ्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष्य करून स्वतःचे लक्ष्य हळुहळू साध्य करत असतात!

आजोबांच्या अविरत डंबेल उचलायचा प्रकार पाहून एक दिवस शेजारची म्हातारी काळजीपोटी त्यांच्या मुलीला कळवते. मुलगी लगेचच येऊन बघते. तिला कळतच नाही की या वयात आपले वडील असं का वागत आहेत. ती वडीलांना समजवायचा प्रयत्न करते. पण ते काही मागे हटायला तयार नसतात! त्यांचे प्रयत्न ते सोडत नाहीत कारण इतके दिवस जे डंबेल त्यांना उचलता पण येत नव्हतं ते आता त्यांना त्यांच्या छातीपर्यंत बऱ्यापैकी उचलता यायला लागतं. 

असं करता करता एक दिवस आजोबा ते डंबेल दोन्ही हातांनी व्यवस्थित त्यांच्या डोक्याच्या वर उचलून धरतात! काय खुश होतात म्हणून सांगू! अगदी लहान मुलांसारखी ऊडी मारून आनंद व्यक्त करतात! हे पाहुन आजुबाजूच्या शेजारांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसतो! तेच शेजारी जे इतके दिवस आजोबांकडे विचित्र नजरेने पाहत असतात. खोचक म्हातारी पण आनंदी दिसते. 

मग तो दिवस उजाडतो! आजोबा मुलीच्या घरी नाताळसाठी जातात. सात आठ वर्षांच्या नातीसाठी छानशी भेटवस्तु नेतात. आजोबांना बघुन नात खुश होऊन त्यांच्याजवळ जाते. म्हातारे आजोबा नातीला पटकन उचलुन घेऊन, नाताळसाठी सजवलेल्या उंच झाडाजवळ नेतात आणि नातीला सफाईदारपणे स्वतःच्या डोक्याच्या वर उंच उचलुन धरतात आणि त्यांची नात त्या झाडाच्या टोकावर सुंदरशी चांदणी लावते! आजोबांच्या डोळ्यांत अश्रूंच्या चांदण्या चमकतात!

ते पाहुन आजोबांच्या लेकीला इतके दिवस पडलेल्या कोड्याची उकल होते की आपले म्हातारे वडील इतके दिवस इतकं जड डंबेल कशासाठी उचलत होते ते आणि तिच्याही डोळ्यांत अश्रु येतात!

प्रयन्तांती परमेश्वर म्हणतात ते काही खोटं नाहीये, हो ना!

(वरील वर्णन एका जर्मन भाषेतल्या सुंदर जाहिरातीचं आहे!)

#माझी_जर्मनी_डायरी

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

म्हातारपण काय आहे?

.      _*म्हातारपण काय आहे? समर्थानी*_ 
                   _*केलेले सुंदर वर्णन,*_

_समर्थांनी दासबोधात फार सुंदर वर्णन केलं आहे. त्यांनी ऋणानुबंध हा शब्द घातलेला हे आहे. ऋण म्हणजे कर्ज आणि बंध म्हणजे  संबध कींवा बांधला गेलेला. तर महाराज याच्यावर सांगायचे की तुमचं देणंघेणं असतं म्हणून तुम्ही एकमेकांच्या संबधात येता आणि जोपर्यंत तुमचं एकमेकाविषयी ऋण फीटत नाही तोपर्यंत आपली सुटका नाही. आपलं एकमेका विषयी काहीतरी देणंघेणं असल्या मुळे एकमेकांना मदत करुन ऋण फेडता._

म्हातारपण फार चमत्कारिक आहे. तुम्ही काहीतरी अध्यात्म करीत असाल तर तुम्हाला पुढे त्रास होणार नाही. परंतु तेच जर आपण व्यवहारातच जर राहीला तर अवघड आहे. नामस्मरण कींवा काही साधन जर तुम्ही तारुण्या पासूनच करत असाल तर पुढे तुम्हाला त्याची सवय लागते आणि मनाला एक वळण लागतं मग पुढे सुखदुःखात त्याला नामाचीच/त्या साधनाचीच आठवण राहील.

_*म्हातारपण सहन करणं फार कठीण आहे. शरीरातील  जीवन शक्ती कमी होते. बसलेले उठवत नाही. उठलेले झोपवत नाही. अंगातली कर्मशक्ती क्षीण होते. बरोबरचे लोक मरण पावतात. तेव्हा माणूस विचलित होतो.*_

म्हातारपणी जर तुम्हाला साधनेची काही सवय नसेल तर फार अवघड आहे. कारण जीवनाचा अभ्यास केला तर असे आढळते की नामसाधनाची आवड असेल तर मन लगेच नियंत्रणात येतं. तेच जर काही साधन नसेल मनावर अंकुश येणं फारच कठीण आहे.

म्हणून  भगवान श्रीरामकृष्ण नेहमी म्हणायचे एखादी कपड्याची फॅक्टरी आहे आणि त्यात कपड्याला कलर लावायला एक माणूस पूर्वी असायचा. त्याला डायिंग मास्टर म्हणतात.
त्याने एकदा कपडा रंगवला की संपलं. परत तो कपड्याचा रंग बदलता येत नाही.

तसे माणसचे वय एकदा पंन्नास पंच्चावन्न च्या पुढे गेलं की संपलं. या वयाच्या पुढे त्याला समजून पण सुधारणा करता येत नाही. आणि म्हणून लहानपणा पासूनच कींवा तारुण्यात च साधनेची आवड पाहीजे नाहीतर कठीण आहे. _माझ्या मते तारुण्याचे कींवा समजायला लागलेल्या वया पासूनच्या कर्माचं रीझलटंन्ट म्हणजे म्हातरपण आहे._

कारण जर तुम्ही नीट वागला, चांगल्या कामाची सवय कींवा साधनेचा व्यासंग जर असेल तरच शेवटी जीवन व्यवस्थित जातं. जास्त कष्ट पडत नाहीत. म्हणून जीवनात शिस्त, चांगुलपणा, साधनेची आवड, परिश्रम करण्याची वृत्ती आणि तत्परता हे गुण कामी येतात. आपण म्हणतो म्हातारपणी पैसा असल्यावर कींवा समाजात मान असल्यावर घाबरण्याचे कारण नाही पण खरं तसं नाहीये.

याचं उत्तम उदा. पुढे देत आहे. एकदा लोकमान्य पुण्याला  बंडगार्डन मध्ये फीरायला गेले होते. तेथे डॉ.भांडारकर पण आले होते. सकाळची वेळ होती. दोघांची एकमेकां कडे दृष्टादृष्ट झाली. लोकमान्यांना ते पुर्वी शिकवायला होते. लोकमान्य त्यांच्याकडे जाऊन त्यांचे पाया पडले. तेव्हा भांडारकरांनी त्यांना लगेच ओळखलं नाही. कोण रे तू असे त्यांनी विचारल्यावर मी बाळ गंगाधर टिळक असं टिळक म्हणाले. तेव्हा भांडारकर म्हणला अरे तु अत्ताच थकलास. लोकमान्य त्यावेळी ५९-६० वर्षाचे होते. ते शांत उभे राहिले. व म्हणाले आपण भाग्यवान अहात. की आपल्याला येवढं जीवन मिळालं.

तेव्हा भांडारकर म्हणाले की तु चुकतोयेस. अरे म्हातारपण सुखाचं नाही. शाररीक दुःख, मानसिक दुःख व आपल्या पोरबाळांची दुःख पण सहन करावी लागतात. आणि म्हणून महाराज नेहमी म्हणायचे की आपल्या समजत्या वयातच आपलं ध्येय ठरलेलं असावं. म्हणजे मग त्या ध्येयाच्या दृष्टीने पावलं टाकली जातात.
मग त्यामुळे माणूस सुखदुःखात पण दुःखीकष्टी होत नाही. म्हणूनच खरंतर आपणच आपले चांगले मित्र वा शत्रू आहोत. उगीच मुलाबाळांसह बायको कींवा नातेवाईकांवर आवलंबून राहणे उपयोगाचे नाही. माझा गुरु हेच माझं धेय्य असावं व त्यांनी सांगितलेले साधन हा मार्ग.

मग काय सर्व अलबेल होईल यात शंकाच नाही. भगवदगीतेत भगवंतांनी तेच सांगितलेले आहे की सतत चांगले कर्म करत रहा कींवा, तुमच्या कर्मात मला घाला म्हणजे नामात रहा म्हणजे तो खरा कर्मयोगी होय. आता निवृत्त झाल्यावर चांगले कर्म म्हणजे काय असणार तर साधन आणि जमेल तशी लोकसेवा कींवा समाज जागृती. ती कशी करायची हे ज्याच्या त्याच्या स्वभावा नुसार ठरवावे.

निंबाळ सांप्रदायाचे हे गुरुदेव रानडे होते ना, त्यांना एकाने विचारले की तुम्ही नुसते नाम घेत बसता त्यापेक्षा समाजकार्य का करीत नाही. तेव्हा ते म्हणाले की मी येवढे एका खोलीत बंदिस्त राहून जे नाम करतोय त्यामुळे माझ्या आसपास एक चांगले आवरण तयार होते व त्यामुळे लोकांच बर होत असणारच. या माझ्या साधनेने कुठे वा कुठे तरी फायदा होत असणारच. तो कुणाला व कुठे हे मात्र मी सांगू शकत नाही. पण समाजाचं भलं होत असलंच पाहीजे.

           _कारण माऊलीने म्हणल्या प्रमाणे_
    _खळांची व्यंकटी सांडो, "सत्कर्मे रती वाढो"_ 
                   असं म्हणलं आहे.

विचार करा माऊली म्हणतात की माझ्या प्रार्थनेनं जगातलं दुःख कमी होऊ देत हे खरं मागणं आहे. आणि म्हातारा जर साधनी असेल तर जिंकलं असं म्हणायला हरकत नाही.

ज्याचा अंतकाळ नामात झाला त्याने जिंकलं. असं महाराज म्हणायचे.

                     एक विनम्र चिंतन.

संदर्भ - प. पू. बेलसरे निरुपणे आणि ग्रंथभांडार.

                     ! श्री राम समर्थ !