Saturday, June 11, 2011

पाऊस पडुन गेल्यावर.......

पाऊस पडुन गेल्यावर मन पागुळ्यांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले
थेबांना सावरलेल्या त्या गवतांच्या काडांचा
पाऊस पडुन गेल्यावर मी भिजलेल्या झाडांचा

पाऊस पडुन गेल्यावर मन थेंबांचे, गारांचे
आईस चकवुनी आल्या त्या डबक्यातील पोरांचे
मोडून मनाची दारे हि ओली पाउलभरती
पाऊस पडुन गेल्यावर या ओल्या रस्त्यांवरती

पाऊस पडुन गेल्यावर मी च्रंद चिबं भिजलेला
विझवून चांदण्या साऱ्या विझलेला शांत निजलेला
पाऊस पडुन गेल्यावर मन भिरभिरता पारवा
पाऊस पडुन गेल्यावर मन गार ढगात गारवा

No comments:

Post a Comment