Thursday, June 16, 2011

बायको म्हणजे.....



बायको म्हणजे एक सावली
उन्हाला शांत करणारी
बायको असते पावलोपावली
घराला घरपण देणारी

बायको म्हणजे निश्चिंतता
घर सुरळीत चालेल याची
बायको म्हणजे नेमकी जाणीव
गृहस्थाला कर्तव्याची

बायको म्हणजे ओले केस
न्हाल्यानंतर भुलवणारे
बायको म्हणजे सुगंधाचेच
कारण जीवनात दरवळणारे

बायको म्हणजे गोड कारण
घरी लवकर जाण्यासाठी
बायको म्हणजे प्रेमळ घास
हसत हसत खाण्यासाठी

बायको म्हणजे प्रेमळ काळजी
हवीहवीशी वाटणारी
बायको म्हणजे अधिर ओढ
अस्तित्वाला व्यापणारी

बायको म्हणजे सावध विवेक
सगळीकडे जाणवणारा
बायको म्हणजे नेमका आवेग
सुरळीत गाडा चालवणारा

बायको म्हणजे संपूर्णता
गृहस्थाच्या जगण्याची
बायको म्हणजे समर्थता
माणसाला यश पचवण्याची...


source:www.marathikatta.net

No comments:

Post a Comment