आई हा एक शब्द आहे असं म्हणण व्यर्थ आहे
कारण त्यात जे वात्सल्य आहे ते शब्दात उतरवणं अशक्य आहे!!
जीवन हे शेत तर आई हि विहीर
जीवन हि नौका तर आई हि तीर
जीवन हि शाळा तर आई हि पती
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी
आई तू उन्हा मधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दु:खे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावीअशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी.......
मी एक चातक आहे तर ती पर्जन्यचा थेंब आहे
मी अत्तर तर ती त्यातला सुगंध आहे
माझ्या आयुष्याची ती एक चित्रकार आहे
अंधारात मला दिसणारा आशेचा किरण आहे
कोणत्याही वादळात तग धरून राहीलेली माझ्या आयुष्यातील कल्पतरु आहे
ती माझी...... फक्त माझीच आई आहे......
कारण त्यात जे वात्सल्य आहे ते शब्दात उतरवणं अशक्य आहे!!
जीवन हे शेत तर आई हि विहीर
जीवन हि नौका तर आई हि तीर
जीवन हि शाळा तर आई हि पती
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी
आई तू उन्हा मधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दु:खे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावीअशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी.......
मी एक चातक आहे तर ती पर्जन्यचा थेंब आहे
मी अत्तर तर ती त्यातला सुगंध आहे
माझ्या आयुष्याची ती एक चित्रकार आहे
अंधारात मला दिसणारा आशेचा किरण आहे
कोणत्याही वादळात तग धरून राहीलेली माझ्या आयुष्यातील कल्पतरु आहे
ती माझी...... फक्त माझीच आई आहे......
No comments:
Post a Comment