Tuesday, September 25, 2018

दृष्टिकोन

“आत येऊ”... ‘अरे तुम्ही, या ना’... रोहित अणि त्याची आई माझ्याकडे आले होते…
“रोहित घरी अभ्यासच करत नाही. मी त्याला सांगून, ओरडून थकले आता, शाळेत टेस्ट असेल तर 3 ते 4 दिवस अणि सहामाही किंवा वार्षिक परीक्षा असेल हा आमच्यावर उपकार केल्यासारखे 10 दिवस आधी अभ्यास करतो. ह्याला महत्त्वच नाही कशाचं”... आवाजातून काळजी व उद्विग्नता जाणवत होती..
मी रोहित कडे पाहिले अणि पोपट बोलायला लागला… “हे बघ हं, मला 83/84 टक्के पडतात… बर दहावी झाल्यावर मला कॉमर्सला जायचंय… कुठलंही कॉलेज मिळाल तरी चालणार. माझे CA आणि CS करायचे प्लॅन आहेत…. मग नंतर कष्ट लागणार आहेत… अणि मला ह्या अभ्यासाचा कंटाळा येतो… आत्ता कशाला असला अभ्यास करू … वेळ आल्यावर करेन की .. मग मार्क्स मिळवून दाखवेन”....
मला ह्या पिढीच्या पोरांच फार कौतुक वाटतं…. जे काही आहे ते स्पष्ट अणि बिनधास्त बोलून मोकळे होतात… अणि काही फंडा…भले बरोबर नसतील… पण फार clear असतात…
तो अणि आई दोघांचही म्हणणं खोडून काढण्यासारख नव्हतं….
‘हे बघ, आपण इथे तू चुकीचा आहेस म्हणुन भेटलो नाहीये… फक्त आपण एक वेगळा विचार करून जरा अभ्यास अणि मिळणारे मार्क्स याकडे हटके दृष्टिकोनातून बघुया…. अभ्यास हा प्रकार फक्त अभ्यास व मार्क्स ह्या उद्देशाने बघायचा नसतो तर ती एक जीवन कलेची (life skills) शिकवण म्हणून बघ… जास्त एन्जॉय करशील… अभ्यासातून आपल्याला मार्क्स मिळवायचेच आहेत पण त्यातून आपल्याला एक चांगला माणूस म्हणून तयार व्हायचे आहे.. हा विचार करून बघ… घोकंपट्टी करून खर्डेघाशी करण्यापेक्षा आपण काही तरी शिकून आपली विचारांची पातळी कशी वाढवू शकु.. हे पहिले तर अभ्यासाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन तयार होईल… तुला अभ्यासाचा कंटाळा ही येणार नाही व तू जास्त मजा घेऊ शकशील…
… जेंव्हा तुम्ही शालेय जीवनात असता तेंव्हा तुमची सर्वागीण प्रगती (ग्रोथ) अपेक्षित आहे… अगदी मार्क्स मधे सुद्धा… जेंव्हा तुमचे शालेय जीवनाचे मूल्यमापन होते तेंव्हा तुमचे मार्क्स सुद्धा विचारात घेतले जातात… का तर.. लहानपणापासून दिलेल्या व कराव्या लागणाऱ्या गोष्टीत तुम्ही किती प्रामाणिक होतात हे त्यातून कळते

आपली लायकी व कुवत असताना केवळ आळसामुळे मार्क्स न मिळवणे हा गुन्हा आहे… मार्क्स हे दुसर्‍याला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःहाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आवश्यक असतात… आत्ता जे तू म्हणतोयस ना की वेळ आली की मी मार्क्स मिळवेन हा फाजील वा अति आत्मविश्वास आहे.. मार्क्स असो वा काही… ही एक प्रगती आहे…. अणि प्रगती एकदम होत नाही… ती टप्प्याटप्प्याने होते…. आधीच्या पातळीवर झालेली प्रगती ही पुढच्या पातळीची पहिली पायरी (stepping stone) असते… त्यात झालेल्या चुका समजून घेण्याची व त्या सुधारण्याची संधी आपल्याला मिळते… दुर्दैवाने कुठे अपयश आले तर तुम्ही मानसिक दृष्ट्या सक्षम (mentally prepared) होण्यास हे टप्पे आपल्याला तयार करतात…. ह्या वयात आधी मिळालेले यश ही आपल्या आत्मविश्वास व सुदृढ मानसिकतेची शिदोरी असते… का तर अपयश आले तर तुम्हाला ह्या शिदोरी मुळे खात्री असते की मला यशस्वी होता येतं… आपली स्पर्धा आपल्याबरोबरच ठेव म्हणजे ह्या गोष्टी कळायला लागतील…

आपण long टर्म वर विचार करू… ह्या वयात जर अभ्यास न करण्याची म्हणजे कष्ट न करण्याची सवय लागली तर ती पुढील आयुष्यात पटकन जात नाही… प्रत्येक गोष्टींकडे बघण्याचा एक careless, casual दृष्टिकोन तयार होतो, कशाच महत्त्वाच रहात नाही.. अणि एक वेगळी वृत्ती म्हणजे… मिळतय ना! मग आह़े ते ठीक आहे, कशाला जास्त कष्ट करायचे.. अशी तयार होते.. जी सर्वात घातक आहे… कारण आयुष्यात सर्व गोष्टी आयत्या, विनासायास, कष्ट न करता मिळत नाहीत… मनाला efforts घ्यायची तयारी होत नाही अणि हळूहळू नकळत lethargic (आळशी) मानसिकता तयार होते….

नेहमीप्रमाणे आपण वेगळा विचार करू…. तुला जर चांगले मार्क्स मिळाले तर काय…. आई बाबांना किती दिवस अणि कितीसा आनंद होइल?.. एक महिनाभर… ते आपल्या नातेवाईकांना, मित्र मैत्रिणी यांना सांगतील… अगदी हत्ती वरून पेढे वाटतील… पण पुढे काय…. बर मला सांगितल्यावर मला खूप आनंद होईल की तुला 90 टक्के पडले पण तुझ्या नंतर कुणीतरी मला 92 टक्के सांगतात….
पण मिळणारे मार्क्स हे आयुष्यभर तुला उपयोगाला पडणार आहेत… ह्या मार्क्स मुळे तुझा एक प्रकारे Confidence वाढेल व तोच तुला पुढच्या वाटचालीसाठी वरदान ठरेल… तेंव्हा एक गोष्ट लक्षात ठेव की अभ्यास, मार्क्स वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या तू आई बाबा किंवा मी किंवा इतर कोणासाठी करत नसून तो तुझ्या करता करतो आहेस…
वयाच्या चाळीस पन्नाशीला गेल्यावर… माहित नाही.. तुझ्या प्रगतीच्या (प्रमोशन) मूल्यमापनात हेच मार्क्स तुझा asset ठरतील…
So ठरलं… आजपासून गोष्टींकडे आपण जरा वेगळ्या नजरेतून बघुया…’

साधारण ऑक्टोबरच्या शेवटी शेवटी हे बोलणे झालेले…. जून मधे रोहित आला “मला 93 टक्के पडलेत”... ‘व्हेरी गुड… Congrats’...
एवढे मार्क्स मिळाले नसते तर त्याचे करिअर झाले नसते का… असे काही नाही पण ह्या निकालानंतर त्याच्या मनोवृत्तीत जो फरक पडला तो महत्वाचा…

** विक्रम इंगळे **
9545974916

No comments:

Post a Comment